शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

हातमागावरील घोंगडीची कला त्यांनी ठेवली जिवंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2018 14:10 IST

४० वर्षांपासून व्यवसाय: मंगरुळपीर तालुक्यातील पांडुरंग कोल्हेंचा उपक्रम 

-गोपाल माचलकर  पार्डी ताड: मेंढीच्या लोकरा पासून हातमागावर बनणारी घोंगडी आता कालबाह्य झाली असली तरी, मंगरुळपीर तालुक्यातील पार्डी ताड येथील ६८ वर्षीय पांडुरंग कोल्हे यांनी मात्र गेल्या ४० वर्षांपासून ही कला जिवंत ठेवली आहे. या व्यवसायावर उदरनिर्वाह होणे कठीण असले तरी, कला जिवंत राहावी म्हणूनच ते हा व्यवसाय करीत असून, याचे प्रशिक्षण इतरांनीही घ्यावे, अशी त्यांची इच्छा आहे. हातमागावर घोंगड्या बनविणे हा पार्डी ताड येथील पांडुरंग कोल्हे यांचा पारंपरिक व्यवसाय आहे. गेली ४० वर्षांपासून ते हा व्यवसाय करीत आहेत. यासाठी मेंढीचे लोकर अर्थात केस आणण्यासाठी त्यांना परिश्रम करावे लागतात. या लोकरीपासून घोंगडीसाठी धागा तयार करण्यासाठी ५ ते ६ दिवसांचा कालावधी लागतो आणि अखंडा धागा बनल्यानंतर त्यापासून घोंगडी तयार करण्यासाठी दोन दिवस लागतात.

अर्थात एका घोंगडीसाठी त्यांना आठ दिवस परिश्रम करावे लागतात. धागा तयार केल्यानंतर तो चिंचेच्या पाण्यात भिजवून उन्हात वाळविला जातो. त्यानंतर हा धागा सुरळीत करण्यासाठी फणीने विंचरले जाते. मगच धागा हातमागावर उभा, आडवा लावून त्यापासून घोंगडी बनविली जाते. मेंढीच्या लोकरापासून बनलेली घोंगडी उबदार असल्याने शेतकरी वर्गात पूर्वी या घोंगडीला मोठी मागणी होती; परंतु आधुनिक काळात उबदार शाली आणि चादरींची निर्मिती झाल्यानंतर या घोंगडीची मागणी घटली आहे. त्यामुळे हातमागावर घोंगडी बनविणा-या विणकरांची संख्याही आता बोटावर मोजण्याएवढीच उरली आहे; पांडुरंग कोल्हे यांनी मात्र ४० वर्षांपासून ही कला जपली आहे. त्यांनी बनविलेल्या एका घोंगडीचे बाजार मुल्य १३०० रुपये असले तरी, त्यामधून त्यांची मिळकत मात्र अगदीच नगण्य आहे. मंगरुळपीर तालुक्यात हा व्यवसाय करणारे पांडुरंग कोल्हे हे एकमेव असले तरी, शासनाकडून मात्र त्यांच्या कलेची उपेक्षाच होत आहे.  शासनाने कलेची जोपासना करावी ! मेंढ्यांच्या लोकरापासून घोंगड्या बनविण्याची कला ही पारंपरिक आणि अनन्य साधारण असून, पर्यावरणपुरक अशीच आहे. या कलेची जोपासणा करून विणकरांना बाजारपेठ उपलब्ध करून दिल्यास हातमागावर घोंगडी विणण्याचा व्यवसाय वृद्धीगंत होऊन लोकांना रोजगाराचा नवा पर्याय मिळेल. त्यामुळे शासनाने या कलेचा विकास करून ती जोपासण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी पांडुरंग कोल्हे यांनी केली आहे.