शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

रिसोड तालुक्यात ११ कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणीच नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 14:24 IST

रिसोड : ग्रामीण विकासाला चालना देणाऱ्या  ११ कलमी कार्यक्रमाची रिसोड तालुक्यात अंमलबजावणी नाही तसेच रोजगार हमी योजनेंतर्गतची कामे प्रलंबित असल्याने पंचायत समिती सभापती-उपसभापतींसह सदस्यही आक्रमक झाले आहेत.

ठळक मुद्देवाशिम जिल्ह्यात सन २०१४ पासून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत अनेक कामे अपूर्ण आहेत.ही अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासन जाणीवपूर्वक चालढकल करून विकास कामांना खीळ घालत असल्याचा आरोप पंचायत समिती सभापतींसह सदस्यांनी केला.जिल्ह्यातील सहा पंचायत समितीच्या जवळपास ३५ ते ४० सदस्यांनी गृह राज्यमंत्री डॉ. पाटील यांच्याशी चर्चा केली. 

रिसोड : ग्रामीण विकासाला चालना देणाऱ्या  ११ कलमी कार्यक्रमाची रिसोड तालुक्यात अंमलबजावणी नाही तसेच रोजगार हमी योजनेंतर्गतची कामे प्रलंबित असल्याने पंचायत समिती सभापती-उपसभापतींसह सदस्यही आक्रमक झाले आहेत. यासंदर्भात पंचायत समितीच्या पदाधिकाºयांनी २६ डिसेंबरला गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्यासह जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले.

वाशिम जिल्ह्यात सन २०१४ पासून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत अनेक कामे अपूर्ण आहेत. यामध्ये नाला सरळीकरण, पाणंद रस्ते, सिंचन विहिरींसह इतर विकासात्मक कामांचा समावेश आहे. ही अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासन जाणीवपूर्वक चालढकल करून विकास कामांना खीळ घालत असल्याचा आरोप पंचायत समिती सभापतींसह सदस्यांनी गृहराज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांना दिलेल्या निवेदनातून केला. डॉ. पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला अपूर्ण कामे त्वरित सुरू करून फडणवीस सरकारच्या ग्रामीण विकासाला मोठा हातभार लावणाºया महत्वाकांक्षी अशा ११ कलमी कार्यक्रमाची अमंलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना फोनद्वारे दिले, अशी माहिती पंचायत समितीच्या सभापती छाया सुनील पाटील यांनी दिली. रिसोड पंचायत समितीच्या यशोदा भाग्यवंत, ज्योती मोरे, अंजली शिंदे, मंगला खरात, कमल करंगे, कावेरी अवचार, चंद्रकला बांगरे, श्रीकांत कोरडे, एकनाथ घुकसे, नंदुभाऊ घुगे या पंचायत समिती सदस्यांसह जिल्ह्यातील सहा पंचायत समितीच्या जवळपास ३५ ते ४० सदस्यांनी गृह राज्यमंत्री डॉ. पाटील यांच्याशी चर्चा केली. 

लवकरच वाशिम जिल्यातील सर्व पंचायत समिती सभापतींसह दहा सदस्यांची विशेष बैठक मंत्रालयात घेण्यात येणार असून या बैठकीला मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, रोजगार हमी मंत्री ना.जयकुमार रावल आदींची उपस्थिती राहिल, अशी ग्वाही गृह राज्यमंत्री  डॉ.रणजित पाटील यांनी दिली, असेही सभापती छाया पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिम