शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कारंजा उपजिल्हा रुग्णालयाचे ‘फायर ऑडिटच’च नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:31 IST

भंडारा येथील सामान्य रुग्णालयाला लागलेल्या आगीच्या घटनेत काही रुग्णांचा करुण अंत झाला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जिल्हा सामान्य रुग्णालय, ...

भंडारा येथील सामान्य रुग्णालयाला लागलेल्या आगीच्या घटनेत काही रुग्णांचा करुण अंत झाला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जिल्हा सामान्य रुग्णालय, कारंजा उपजिल्हा रुग्णालयातील फायर ऑडिट व अग्निरोधक सिलिंडरची परिस्थिती नेमकी कशी आहे, यासंदर्भात ‘रिअ‍ॅलिटी चेक’ केले असता कारंजा उपजिल्हा रुग्णालयातील काही गंभीर बाबी समोर आल्या. १०० खाटांचे असलेले कारंजा उपजिल्हा रुग्णालय हे २०१७ पासून रुग्णसेवेत आले असून, रुग्णालय इमारतीत आवश्यक त्या भौतिक सुविधा उपलब्ध न करताच या इमारतीचे आरोग्य विभागाकडे हस्तांतरण करण्यात आले. रॅम्पचे बांधकाम, महाराष्ट्र फायर सेफ्टी अ‍ॅक्ट २००२ च्या मानकानुसार अग्निशमन यंत्रणा, संकटकाळी सुटकेचा मार्ग तसेच विद्युत पुरवठा व रोहित्र बसविणे याशिवाय इतर महत्वाच्या बाबींची पुर्तता झाली नाही. यासंदर्भात वैद्यकीय अधीक्षक डॉ. भाऊसाहेब लहाने यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग कारंजाच्या सहायक अभियंत्यांशी पत्रव्यवहारही केला. परंतू, अद्याप हा प्रश्न निकाली निघू शकला नसल्याचे डॉ.लहाने यांनी सांगितले. दरम्यान, वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयाचे गतवर्षी फायर ऑडिट झाले होते. ११ महिन्यानंतर फायर ऑडिट करणे आवश्यक असून, २०२१ मध्ये लवकरच फायर ऑडिटसंदर्भात संबंधितांशी पत्रव्यवहार केला जाईल, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.

०००००००

अग्निरोधक सिलिंडरची पाच वर्षाची मुदत

जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयातील विविध विभागात खबरदारीचा उपाय म्हणून अग्निरोधक सिलिंडर बसविण्यात आले आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयात २०१८ मध्ये तर कारंजा उपजिल्हा रुग्णालयात २०१८ मध्ये अग्निरोधक सिलिंडर बसविण्यात आले आहेत. या सिलिंडरची मुदत पाच वर्षे असून, वर्षातून एकदा संबंधित कंपनीकडून पाहणी होणे गरजेचे आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील अग्निरोधक सिलिंडरची पाहणी २०१९ मध्ये केली होती तर कारंजा उपजिल्हा रुग्णालयातील पाहणी अनियमित असल्याची माहिती आहे.

०००००

जिल्हा सामान्य रुग्णालयाचे फायर ऑडिट झाले असून, अग्निरोधक सिलिंडरही अद्ययावत आहेत. आगीच्या घटना घडू नये तसेच आगीच्या घटनेवर वेळीच नियंत्रण मिळावे म्हणून शनिवारी पुन्हा अग्निशमन यंत्रणेची पाहणी करण्यात आली. यापुढेही अधिक दक्षता घेण्यात येईल.

- डॉ. मधुकर राठोड,

जिल्हा शल्य चिकित्सक

०००००००००

कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालयात अग्निशमन यंत्रणा, संकटकाळी सुटकेचा मार्ग यासह अन्य आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यासंदर्भात बांधकाम विभागाशी पाठपुरावा केलेला आहे. अद्याप सुविधा उपलब्ध करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.

- डॉ. भाऊसाहेब लहाने

वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय कारंजा