शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

प्रलंबित मानधनासाठी ‘थाळी नाद’ आंदोलन

By admin | Updated: April 28, 2017 01:44 IST

जिल्हा परिषेदसमोर धरणे: पोषण आहार स्वयंपाकी, मदतनीस, बचतगट सदस्यांचा सहभाग

वाशिम: मागील १० महिन्यांपासून प्रलंबित असलेले मानधन मिळण्यासह विविध मागण्यांसाठी शालेय पोषण आहार स्वयंपाकी, मदतनीस, बचतगट संघटना महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने गुुरवारी जिल्हा परिषद कार्यालय परिसरात एकदिवसीय थाळीनाद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेकडो कामगारांनी सहभाग नोंदविला. जिल्ह्यातील पोषण आहार शालेय पोषण आहार स्वयंपाकी, मदतनीस, बचतगट संघटनेचे मागील ८ महिन्यांपासून त्यांचे मानधन मिळाले नाही. त्याशिवाय त्यांना भाजीपाला, इंधनाच्या खर्चाची रक्कमही अदा करण्यात आलेली नाही. पोषण आहार कामगार, बचतगटाच्यावतीने या संदर्भात सर्व संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देऊन मानधन अदा करण्याची मागणी करण्यासह मानधन १० हजार रुपये देवून कायम सेवेत घ्यावे, महिला बचतगटामार्फत राशन दुकानामधील सर्व वस्तू गटामार्फत देण्यात यावे, शालेय पोषण आहार योजनेतंर्गत डाटा एंट्री आॅपरेटर यांना २० हजार रुपये मानधन द्यावे, कामावरून कमी केलेल्या स्वयंपाकी व मदतनिस यांना तत्काळ कामावर घ्यावे यासह इतर मागण्यांसाठी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद कार्यालय परिसरात उपोषण, धरणे आंदोलनही करण्यात आले; परंतु अद्याप प्रशासनाने त्यांच्या मागण्यांची दखल घेतल नाही. दरम्यान, या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता. शालेय पोषण आहाराचे मानधन देण्यासाठी प्राप्त निधीतून संबंधितांना मानधन देण्यात येते. आता यासाठी निधी अपुरा प्राप्त होत असल्याने पोषण आहार स्वयंपाकी, मदतनिसांचे मानधन रखडले असून, निधी प्राप्त होताच त्यांचे मानधन संबंधित पंचायत समित्यांमार्फत त्यांना अदा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत असले तरी, अद्याप त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी पोषण आहार, स्वयंपाकी, मदतनीस, कामगार व बचत गट संघटनांनी आंदोलनाचे हत्यार उपसत एक ताट व एक चमचा घेवून थाळीनाद मोर्चा व जिल्हा परिषदेवर सकाळी ११ वाजतापासून बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी त्यांच्यावतीने मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले. मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना निवेदनावर जिल्हाध्यक्ष अनुराधा काळे, उपाध्यक्ष रेखा लहाने, जिल्हा संघटक बेबी भगत यांचेसह स्वाक्षरी आहे. या आंदोलणात पोषण आहार कामगारांनी मोठ्यासंख्येने सहभाग नोंदविला.