वाशिम: स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीत असलेल्या नैसर्गिक आपत्ती नियंत्रण कक्षातील दूरध्वनी गत सहा महिन्यांपासून नादुरुस्त होऊन बंद पडले असून, याबाबत जिल्हाधिकार्यांनी पाठविलेले पत्र भारत संचार निगम लिमीटेडने चक्क केराच्या टोपलीत टाकले आहे.नैसर्गिक आपत्ती नियंत्रण कक्ष या अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या शासकीय विभागाचा दूरध्वनी बंद पडल्याचा फटका नागरिकांसह प्रशासनालाही बसत आहे. सदरचा दूरध्वनी बंद असल्यामुळे अत्यंत महत्त्वाची कामे तसेच अत्यंत महत्त्वाची माहिती उच्चस्तरीय प्रशासनाकडे पोहोचण्यास विलंब लागत आहे. यामुळे नागरिकांना व प्रशासनाला याची झळ बसत आहे. शिवाय कामात खोळंबा होत असून अनेकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. सदर दूरध्वनी नादुरुस्त असल्याबाबत नैसर्गिक आपत्ती नियंत्रण कक्ष या विभागाने वारंवार लेखी तक्रारी भारत निगम लिमीटेड यांना दिल्यानंतरही अद्यापपर्यंत दूरध्वनी बंदच आहे. सदर दूरध्वनी दुरुस्त करण्यासाठी दूरसंचार विभाग आतातरी तत्पर होईल काय, असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
नैसर्गिक आपत्ती नियंत्रण कक्षातील दूरध्वनी सहा महिन्यांपासून बंद
By admin | Updated: April 2, 2015 02:05 IST