शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उपलब्ध नाही...", पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यास युसूफ पठाण जाणार नाही, संसदीय शिष्टमंडळाला नकार
2
स्वतंत्र झाल्यावर कसा असेल बलुचिस्तान देश? जाणून घ्या
3
पाकचा नापाक इरादा भारताला आधीच लक्षात आला, सुवर्ण मंदिरावरील हल्ला 'अशा' प्रकारे उधळून लावला!
4
पाकिस्तानचा मंत्री अध्यक्ष असलेल्या आशिया कपमध्ये भारतीय संघ खेळणार नाही; नाव माघारी घेतले... 
5
Jyoti Mlhotra : "माझ्या मुलीला फसवलं जातंय, ती पाकिस्तानला..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांचा खळबळजनक दावा
6
जगबुडी नदी पुन्हा काळ बनली! अंत्ययात्रेला जाणाऱ्या मुंबईकरांची कार नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू
7
'सितारे जमीन पर' थिएटरमधून थेट युट्यूबवर होणार प्रदर्शित, आमिर खान आणणार PPV मॉडेल
8
बाजारात संमिश्र कल! 'हे' दिग्गज आयटी शेअर घसरले, बँकिंगमध्ये तेजी; एफपीआयचा विश्वास कायम
9
सख्खे शेजारी बनले पक्के वैरी! दारूच्या नशेत वाद विकोपाला गेला; हाणामारीत ३ जणांचा मृत्यू
10
हैदराबादमध्ये मोठा कट उधळला, ISIS शी संबंधित दोघांना अटक; बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त
11
कैलास मानसरोवर यात्रेसाठी आता जास्त पैसे मोजावे लागणार! चीनशी आहे थेट संबंध
12
Rain Update : रत्नागिरीत सकाळपासूनच जोरदार, मुंबईत तुरळक पाऊस; राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट
13
Joe Biden : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोस्टेट कॅन्सर! हाडांपर्यंत पोहोचला आजार
14
राज्यातील तब्बल आठ हजारांहून अधिक गावांत शाळाच नाही; केंद्राने शैक्षणिक परिस्थिती सुधारण्याचे दिले निर्देश
15
एलओसीवर मोठ्या हालचाली! पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी अन् लष्कर ए तोयबाची जमवाजमव; कारस्थान रचण्यास सुरुवात
16
ज्योती मल्होत्रा ​​आणि अरमान यांचा पाकिस्तानशी किती खोल संबंध? हरियाणा पोलिसांचा खुलासा
17
ऑपरेशन सिंदूरबद्दल वादग्रस्त वक्तव्य, प्राध्यापकाला अटक
18
मुख्य सचिव, पोलिसप्रमुख स्वागताला न आल्याने सरन्यायाधीश गवई नाराज; करून दिली प्रोटोकॉल, अनुच्छेद १४२ची आठवण
19
भीक मागितली, रस्त्यावर झोपला अन्..; अभिनेत्याची अवस्था पाहून चाहत्यांना धक्का, काय घडलं नेमकं?
20
‘आग’वार, २५ ठार... ! टॉवेल निर्मिती कारखान्यात होरपळून आठ जणांचा मृत्यू, तर ‘चारमिनार’लगतच्या इमारतीत १७ जणं गुदमरून ठार 

तहसील कार्यालयास रिक्त पदांचे ग्रहण

By admin | Updated: August 3, 2015 02:26 IST

मंगरूळपीर तालुक्यातील तलाठी, मंडळ अधिका-यांची रिक्त पदे भरण्याची गरज.

मंगरुळपीर (जि. वाशिम) : महसूल विभागाच्या येथील तहसील कार्यालयात सात तलाठी, एका मंडळ अधिकारी, एक वरिष्ठ लिपिक व एक नायब तहसीलदार अशी पदे कित्येक दिवसांपासून रिक्त आहेत. परिणामी, कामकाजात व्यत्यय निर्माण झाला आहे. कार्यालयाशी संबंधित अनेक कामे प्रभारींच्या भरवशावर असल्याने विलंब होत आहे, या बाबीचा विचार करून रिक्त पदांच्या ठिकाणी कायम नियुक्त्यांची मागणी करण्यात येत आहे. मंगरुळपीर तालुक्यातील अनेक गावांतील तलाठय़ांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे या गावचे कामकाज इतर तलाठय़ांकडे सोपविण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामपातळीवरील जनसामान्यांसह शेतकर्‍यांच्या विविध कामांत खोळंबा येत आहे. मंगरुळपीर महसूल विभागात एकूण सात मंडळे आणि एका मंडळात सहा ते सात गावे आहेत. या गावांत ४१ तलाठी आहेत. यापैकी एक तलाठी रजा रोखीकरणमध्ये असून, एका मंडळ अधिकार्‍यांसह तलाठय़ांची सात पदे रिक्त आहेत. संजय गांधी निराधार योजना विभागातील नायब तहसीलदार पद रद्द केले असल्याने त्या पदाला पुन्हा मंजुरात देण्याची प्रक्रिया खोळंबली आहे. त्याशिवाय निवडणूक विभाग, पुरवठा विभाग, तसेच इतर काही विभागातील पदे रिक्त आहेत. या सर्व पदांना प्रशासकीय स्तरावर मान्यता असताना आणि येथील अधिकार्‍यांकडून पाठपुरावा केला असतानाही ही पदे भरण्याबाबत वरिष्ठ पातळीवरील अधिकारी उदासीन असल्याचे दिसत आहे. त्यामुळे तालुक्यातील हजारो विद्यार्थी, शेतकर्‍यांसह सर्वसामान्य नागरिकांची अनेक विविध कामे खोळंबत असल्याने त्यांना मोठा मनस्ताप होत आहे. त्याशिवाय रिक्त पदांचा प्रभार सांभाळणारे कर्मचारीही अतिरिक्त जबाबदारीमुळे आपल्या मूळ आस्थापनेच्या ठिकाणच्या कामांना न्याय देण्यात अपयशी ठरत आहेत. त्यांच्यावर पडलेला अतिरिक्त कामाचा बोजा, तसेच रिक्त पदांमुळ खोळंबलेली कामे लक्षात घेऊन जिल्हास्तरावरून मंगरुळपीर तहसील कार्यालयातील रिक्त पदे भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्याची मागणी तालुक्यातील नागरिेक करीत आहेत. दरम्यान, संजय गांधी निराधार योजना विभागातील नायब तहसीलदार पद रद्द झाल्याने तालुक्यातील हजारो निराधार, अपंग, वृद्ध लाभार्थींच्या मानधनाचा प्रश्न बिकट होत असल्याचीही माहिती आहे. त्यामुळे या विभागातील नायब तहसीलदाराच्या पदाला पुन्हा त्वरीत मान्यता देण्याची मागणीही तालुक्यातील निराधार, अपंग, वृद्ध लाभार्थींकडून करण्यात येत आहे. संबंधित विभागाच्या जिल्हास्तरावरील वरिष्ठ अधिकार्‍यांनी या निराधारांच्या मागणीची दखल घेणे आवश्यक आहे.