मेळाव्याला अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता अनिल ढोये, तर अध्यक्षस्थानी विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचे केंद्रीय अध्यक्ष रवींद्र बारई होते. विशेष मागर्दशक म्हणून बुलडाणा लेखा विभागाचे व्यवस्थापक विकास बलाळ, तर विशेष अतिथी म्हणून वाशिम मंडळाचे अधीक्षक अभियंता एस. एस. किन्नूर, कार्यकारी अभियंता विजय मानकर, अतिरिक्त कार्यकारी अभियंता पी.के. चव्हाण, चाचणी विभागाचे कार्यकारी अभियंता चांदेकर, मंडळाचे व्यवस्थापक कुणाल गजभिये उपस्थित होते. या मेळाव्यात वीज बिलवसुलीचे ध्येय गाठणे, कृषी पंप जोडणी धोरण २०२० बाबत जनमानसामध्ये प्रबोधन करणे, वीज गळती कमी करणे, वीज चोरीबाबत उपाययोजना, काम करीत असताना तांत्रिक कामगारांना येणाऱ्या विविध स्वरूपाच्या अडचणी आदी विषयांवर उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यावेळी रवींद्र वैद्य, किशोर सावसाकडे, गणेश गंगावणे, पी. जी. राठोड यांनी विचार व्यक्त केले. संचालन प्रभाकर लहाने यांनी, तर प्रास्ताविक गणेश गंगावणे यांनी केले. आभार शेख अनवर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
तांत्रिक कामगार संघटनेचा परिसंवाद मेळावा उत्साहात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:42 IST