वाशिम : जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या सर्व प्राथमिक शाळांमधील शिक्षकांच्या नियमित वेतनातून कपात होणाऱ्या भविष्य निर्वाह निधीचा हिशोब मार्च २०१५ पासून मिळाला नसून हा प्रश्न अद्याप कायम असल्याची माहिती सूत्रांनी दिली. भविष्य निर्वाह निधी म्हणजे सर्वसाधारणपणे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी किंवा शासकीय कर्मचारी निवृत्त झाल्यावर त्याला उर्वरित आयुष्यात आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी मिळणारी रक्कम होय. तथापि, ही रक्कम शिक्षक कर्मचाऱ्याच्याच वेतनातून दरमहा निश्चित केल्यानुसार कपात करून भविष्य निर्वाह िनिधीच्या खात्यात जमा करण्यात येत असते. सदर निधीतून काही रक्कम गरजेनुसार वेळोवेळी काढण्याचा अधिकारही शिक्षकांना असतो. त्यामुळे शिक्षक किंवा शासकीय कर्मचाऱ्यांच्या नियमित होणाऱ्या वेतनातून भविष्य निर्वाह निधी म्हणून कपात करण्यात येणाऱ्या रकमेचा वापर कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडण्याच्या हेतूने, ज्यामध्ये कौटुंबिक आरोग्य मुलांचे शिक्षण, कौटुंबिक, वैवाहिक, जबाबदाऱ्या, आकस्मिक वैद्यकीय खर्च या पूर्ण करण्यासाठी संबंधीत कर्मचारी किंवा शिक्षक करीत असतात; परंतु गेल्या आर्थिक वर्षात जिल्हा परिषद वाशिम अंतर्गत येणाऱ्या प्राथमिक शिक्षक संवर्गातील शिक्षकांचा भविष्य निर्वाह निधी हा त्यांच्या खात्यामध्ये मार्च २०१५ पासून किती निधी जमा झाला त्याच्या पावत्याच अद्याप शिक्षकांना मिळाल्या नाही. यासाठी राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने शिक्षण विभागाकडे वेळोवेळी निवेदने सादर करण्यात आली. मात्र, त्याची दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे शिक्षक वर्गात रोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शिक्षकांच्या पीएफचा प्रश्न प्रलंबितच!
By admin | Updated: May 2, 2017 00:44 IST