शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाबाह्य शिक्षक बदलीप्रकरणात नियमाला बगल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 14:30 IST

मानोरा: परस्पर समन्वयाने जिल्हाबाह्य बदली झालेल्या शिक्षकाला नियुक्त ठिकाणावरून किमान ३ वर्षे हलविता येत नाही; परंतु मानोरा पंचायत अंतर्गत या नियमाला बगल देण्याचा प्रकार घडला आहे.

ठळक मुद्देवर्धा जिल्ह्यातून मानोरा तालुक्यात गोस्ता येथे बदली झालेल्या शिक्षिकेला तीनच महिन्यात कुपटा येथे हलविले.हे प्रकरण तापत असल्याने सदर शिक्षिकेला पुन्हा गोस्ता येथे रुजूही करण्यात आले. परंतु त्यापूर्वी तिची पदस्थापना कुपटा येथे दाखवून वेतनही काढल्याची चूक उघडकीस आली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा: परस्पर समन्वयाने जिल्हाबाह्य बदली झालेल्या शिक्षकाला नियुक्त ठिकाणावरून किमान ३ वर्षे हलविता येत नाही; परंतु मानोरा पंचायत अंतर्गत या नियमाला बगल देण्याचा प्रकार घडला आहे. वर्धा जिल्ह्यातून मानोरा तालुक्यात गोस्ता येथे बदली झालेल्या शिक्षिकेला तीनच महिन्यात कुपटा येथे हलविले. हे प्रकरण तापत असल्याने सदर शिक्षिकेला पुन्हा गोस्ता येथे रुजूही करण्यात आले; परंतु त्यापूर्वी तिची पदस्थापना कुपटा येथे दाखवून वेतनही काढल्याची चूक उघडकीस आली आहे. वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यात असलेल्या शिवणफळ जिल्हा परिषद शाळेत कार्यरत शिक्षिकेची परस्पर समन्वयातून जिल्हाबाह्य बदली करण्यात आली. या अंतर्गत तिला वाशिम जिल्ह्याच्या मानोरा तालुक्यातील गोस्ता येथे पदस्थापना देण्यात आली. जिल्हाबाह्य बदली प्रकरणात एकदा पदस्थापना दिलेल्या ठिकाणावर किमान ३ वर्षांपर्यंत कार्य करावे लागते. मानोरा पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने मात्र या नियमाला केराची टोपली दाखवित. सदर शिक्षिकेची ३ महिन्यांतच कुपटा येथील जिल्हा परिषद शाळेत रिक्त असलेल्या पदावर नियुक्ती केली. ही चूक उघड होऊन प्रकरण अंगलट आल्याची जाणीव होताच शिक्षण विभागातील संबंधितांनी या शिक्षिकेला गोस्ता येथे परत रुजू केले. दरम्यान, कुपटा येथील रिक्त पद असल्याने त्या पदाचा कार्यभार सोपवून किमान सदर शिक्षिकेचे वेतन हे नियमानुसार गोस्ता येथून काढणे आवश्यक होते, अर्थात सदर शिक्षिकेची तात्पुरत्या स्वरूपाची नियुक्ती दाखविणे गरजेचे होेते; परंतु पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने या शिक्षिकेची पदस्थापनाच कुपटा येथे करून. त्याच शाळेच्या नावे तिचे वेतन मंजूर केल्याचा प्रकारही घडला आहे. हे प्रकरण जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे पोहोचल्यानंतर त्यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन यांच्याकडे या प्रकरणाची चौकशी सोपविली; परंतु त्यात अद्यापही काहीच झालेले नाही. दरम्यान, या संदर्भात मानोरा पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकाºयांशी संपर्क साधून माहिती घेतली असता. या प्रकरणी सर्व संबंधितांशी संवाद साधून प्रकरणाचा उलगडा करणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.

टॅग्स :washimवाशिमManoraमानोरा