शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

क्षयरोग शोध मोहिम : आरोग्य विभागातर्फे १.६७ लाख नागरिकांना गृहभेटी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 15:11 IST

वाशिम: क्षयरोग निदानापासून वंचित असणाºया क्षयरुग्णांचा गृहभेटीद्वारे शोध घेऊन त्यांना उपचाराखाली आणण्यासाठी जिल्ह्यात १८ जून ते ३० जून या  दरम्यान क्षयरुग्ण शोध मोहिम राबविण्यात आली. १.६७  लाख नागरिकांना गृहभेटी देऊन जनजागृती केली.

ठळक मुद्देनिवडण्यात आलेल्या जोखमीच्या २४० क्षेत्रातील एकूण १ लाख ६७ हजार ४५७ लोकसंख्येला गृहभेटी देण्याचे नियोजन होते. कर्मचारी वर्ग यांच्या पथकांनी निवडलेल्या भागांत घरोघरी भेटी देऊन सर्वेक्षण केले. क्षयरोगाची लक्षणे आढळून येणाऱ्या जवळपास ५२ व्यक्तींच्या थुंकी नमुने गोळा करून तपासणीकरीता पाठविण्यात आले.

वाशिम: क्षयरोग निदानापासून वंचित असणाऱ्या क्षयरुग्णांचा गृहभेटीद्वारे शोध घेऊन त्यांना उपचाराखाली आणण्यासाठी जिल्ह्यात १८ जून ते ३० जून या  दरम्यान क्षयरुग्ण शोध मोहिम राबविण्यात आली. १.६७  लाख नागरिकांना गृहभेटी देऊन जनजागृती केली.क्षयरूग्णांची संख्या कमी करणे तसेच यासंदर्भात जनजागृती करणे, क्षयरुग्णांना उपचाराखाली आणणे या उद्देशाने आरोग्य विभागाने गृहभेटी हा उपक्रम राबविला. या मोहिमेसाठी वाशिम जिल्ह्यात क्षयरोग अधिकारी व आशा सेविका, स्वयंसेवक यांच्या २४४ चमू तयार केल्या होत्या. जिल्ह्यातील निवडण्यात आलेल्या जोखमीच्या २४० क्षेत्रातील एकूण १ लाख ६७ हजार ४५७ लोकसंख्येला गृहभेटी देण्याचे नियोजन होते. १.६७ लाख नागरिकांना गृहभेटी देऊन संवाद साधण्यात आला. या मोहिमेतून जवळपास ५२ संशयित  रू्ण आढळून आले आहेत. थुंकी तपासणे, आवश्यकतेनुसार क्ष-किरण तपासणीसह इतर तपासण्या करून निदान करून संशयित आढळणाºयांवर  औषधोपचार केले जाणार आहेत. सुधारित क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमातील कर्मचाºयांचे भागधारक, अशासकीय संस्था, तसेच सार्वजनिक आरोग्य सेवेतील कर्मचारी वर्ग यांच्या पथकांनी निवडलेल्या भागांत घरोघरी भेटी देऊन सर्वेक्षण केले. सार्वजनिक आरोग्य सेवेतील कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, तसेच नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी आणि इतर स्वयंसेवक आदींनी  गृहभेटीसाठी परिश्रम घेतले. क्षयरोगाची लक्षणे आढळून येणाऱ्या जवळपास ५२ व्यक्तींच्या थुंकी नमुने गोळा करून तपासणीकरीता पाठविण्यात आले.