शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम  जिल्ह्यातील टीबी आणि एचआयव्ही रूग्णांचीही हाेणार कोरोनाची चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 15:53 IST

Washim News जिल्ह्यात  क्षयरुग्ण व एडस् रुग्णांचे घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता १ डिसेंबरपासून क्षयरोग (टीबी) व एचआयव्ही पाॅझिटिव्ह (एडस) रुग्णांची कोरोना चाचणी केली जाणार आहे. त्या दृृष्टीकोनातून जिल्ह्यात आरोग्य विभागातर्फे पूर्वतयारी करण्यात येत आहे.नोव्हेंबर महिन्यात कोरोनाचा आलेख खाली आल्याने जिल्हावासियांना दिलासा मिळत आहे. परंतू, डिसेंबर महिन्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ही शक्यता लक्षात घेता जिल्ह्यात  क्षयरुग्ण व एडस् रुग्णांचे घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासाठी आरोग्य विभागाने चमू नेमल्या असून, कोणत्या तालुक्यात कोणती चमू जाणार, सर्वेक्षण व तपासणी याचे नियोजन करण्यात येत आहे. क्षयरुग्ण तसेच एडस रुग्णांना कोरोनाचा संसर्ग झाला का, या गटातील रुग्ण जोखीम गटात आहे का या अनुषंगाने हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणादरम्यान संदिग्ध दिसून येणाऱ्या रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने आरोग्य विभागाची तयारी सुरू आहे. जोखीम व अतिजोखीम गटातील नागरिकांना कोरोना संसर्गाचा अधिक धोका असतो. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जोखीम व अतिजोखीम गटातील रुग्णांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. क्षयरुग्ण व एचआयव्ही पाॅझिटिव्ह रुग्णांचेदेखील सर्वेक्षण केले जाणार आहे.- डाॅ. अविनाश आहेर, जिल्हा आरोग्य अधिकारी वाशिम

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याwashimवाशिमHIV-AIDSएड्स