शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांना मिळणार निवडणूक मानधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2019 16:12 IST

सन २०१९-२० या वित्तीय वर्षापासून प्रतिवर्षी १२ हजार रुपये एवढे मानधन दिले जाणार आहे.

वाशिम : मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, पर्यवेक्षक म्हणून कामकाज करणाºया राज्यातील तलाठी, मंडळ अधिकाºयांना आता मानधन मिळणार असून, सामान्य प्रशासन विभागाने २६ सप्टेंबर रोजी तसा शासन निर्णयही जारी केला आहे. यासंदर्भात तलाठी, मंडळ अधिकारी समन्वय महासंघाने शासनस्तरावर पाठपुरावा केला होता.निवडणूक कालावधीत राज्यामध्ये मनुष्यबळाची उपलब्धता व कामाची सोय या दृष्टिने पर्यवेक्षक या पदावर बहुतेक ठिकाणी मंडळ अधिकारी व तलाठी संवर्गातील कर्मचाºयांची नियुक्ती केली जाते. लोकसभा निवडणुकीदरम्यान पर्यवेक्षकांच्या देय मानधनाकरीता काही ठिकाणी निधीची मागणी नोंदविलेली नसल्याची बाब महाराष्ट्र राज्य तलाठी, पटवारी, मंडळ अधिकारी समन्वय महासंघाच्या निदर्शनात आली होती. निवडणुकीविषयक कामकाज करणाºया तलाठी, मंडळ अधिकाºयांना मानधन देण्याची मागणीही तलाठी, मंडळ अधिकारी समन्वय महासंघाने मुख्य निवडणूक अधिकाºयांकडे रेटून धरली होती. याची दखल घेत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, पर्यवेक्षक म्हणून कार्य करणाºया तलाठी, मंडळ अधिकाºयांना मानधन देण्यासंदर्भात राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने २६ सप्टेंबरला आदेश जारी केले. राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाच्या छायाचित्र मतदार याद्यांची विश्वसनियता सुनिश्चित होण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रत्येक मतदान केंद्रासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांची नेमणूक झालेली आहे तसेच प्रत्येक १० मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या कामकाजाचे देखरेख व मुल्यमापन करण्यासाठी एका पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, पर्यवेक्षक हे त्यांच्यावर सोपविण्यात येणारी सदर कामे त्यांच्या मूळ कार्यालयातील कामे सांभाळून करणार असल्यामुळे त्यांना या कामांसाठी सन २०१९-२० या वित्तीय वर्षापासून प्रतिवर्षी १२ हजार रुपये एवढे मानधन दिले जाणार आहे.निवडणुक कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, पर्यवेक्षक म्हणून तलाठी, मंडळ अधिकाºयांवर जबाबदारी सोपविली जाते. या कर्मचाºयांना मानधन मिळावे, अशी मागणी मुख्य निवडणूक अधिकाºयांकडे केली होती. यासंदर्भात अपर मुख्य सचिवांशी चर्चाही केली होती. अखेर २६ सप्टेंबर रोजी यासंदर्भात शासन निर्णय जाहिर झाल्याने संघटनेच्या मागणीला मोठे यश मिळाले आहे.- शाम जोशी,अध्यक्ष तलाठी, मंडळ अधिकारी समन्वय महासंघ महाराष्ट्र राज्य.

टॅग्स :washimवाशिम