--------------
नाल्यात घाण, गावात अस्वच्छता
रिसोड: तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतील पावसाळा संपत आला तरी स्वच्छतेची कामे करण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे नाल्या गच्च भरल्या असून, सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याने आरोग्याला धोका आहे. ग्रामपंचायतने मान्सूनपूर्व कामे करण्याची मागणी ग्रामस्थांनी शुक्रवारी केली.
-----------
जडवाहनांमुळे ग्रामीण रस्त्याची दैना
रिसोड: तालुक्यातील ग्रामीण भागांतील विविध रस्त्यांवरून महामार्गाच्या कामासाठी गौणखनिज नेणारी जडवाहने सतत धावत असल्याने या रस्त्यांची अवस्था वाईट झाली आहे. याची दखल घेण्याची मागणी होत आहे.
------------
दिशादर्शक फलकाअभावी चालकांची दिशाभूल
रिसोड: तालुक्यातील अनेक गावांतून मुख्य मार्गाला जोडणाऱ्या फाट्यावर दिशादर्शक फलक नाही. त्यामुळे या मार्गाने वाहने चालविणाऱ्या चालकांत संभ्रम निर्माण होऊन त्यांचा मार्ग चुकत आहे. याची दखल घेण्याची मागणी होत आहे.
^^^^^^^^^^
रिसोड-मालेगाव रस्त्याची दुरवस्था
रिसोड: रिसोड ते मालेगाव या मुख्य मार्गादरम्यान रिसोडपासून १० ते १५ किलोमीटर अंतरातील रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे चालकांना वाहन चालविताना अडचणी येत असून, यातून एखादवेळी अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
---------
आशा, गटप्रवर्तकांचे मानधन वाढविण्याची मागणी
रिसोड: कोरोना संसर्गाच्या काळात जीव धोक्यात घालून शासन, प्रशासनाने सोपविलेली जबाबदारी खंबीरपणे पार पाडणाऱ्या आशा सेविका, गटप्रवर्तक व बीसीएम यांच्या मानधनात समाधानकारक वाढ करून त्यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी आयटक संघटनेकडून होत आहे.
---------
रिसाेड पशुसंवर्धन विभागाची पदे रिक्त
रिसाेड: तालुक्यात पशुसंवर्धन विभागातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसह इतर काही पदे रिक्त आहेत. तालुक्यातील काही ठिकाणची पशुवैद्यकीय अधिकारी पदे रिक्त आहेत. प्रथम श्रेणी पशुवैद्यकीय केंद्रांचा कारभार प्रभारीचा खांद्यावर आहे. त्यामुळे पशुपालकांना गुरांवर उपचार करण्यात अडचणी येत आहेत.
-------
शेतकऱ्यांना जाणवतोय मजुरांचा तुटवडा
रिसोड: जिल्ह्यात परतीच्या पावसाने थैमान घातल्यानंतर पिकांवर विविध रोग पसरले आहेत. त्यात गत आठवड्यात आलेल्या पावसाने पिकांत तणही वाढत आहे. हे तण काढण्यासाठी शेतकऱ्यांना महिला मजूर मिळेनासे झाले आहेत.
---------------
सापांपासून सावध राहण्याचे आवाहन
रिसाेड: तालुक्यात सोयाबीनसह खरीप पिकांची जोमदार वाढ झाली आहे. या पिकांत नाग, घोणस, मण्यार या विषारी सापांचा खाद्यासाठी संचार वाढला आहे. त्यामुळे सापांपासून सावध राहण्याचा इशारा सर्पमित्र तथा वन्यजीव प्रेमींनी शेतकऱ्यांना दिला आहे.
---------------
170921\screenshot_2021-09-17-15-29-20-36.png
अन्नपूर्ण गंजे