शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

गरीबाच्या मुलांना शिक्षीत करण्यासाठी पुढाकार घ्यायलाच हवा - हिरामन इंगोले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 16:24 IST

गोरगरिबांच्या पाल्यांसाठी शिक्षणसंस्था उभारणारे सामाजिक कार्यकर्ते हिरामन निवृत्ती इंगोले यांच्याशी साधलेला  संवाद...... 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :जन्मत: अंध असतानाही लाचारीचे जीवन न पत्करता बालपणापासूनच परिश्रम करून स्वत:चे अस्तित्व रेखाटत गोरगरिबांच्या पाल्यांसाठी शिक्षणसंस्था उभारणारे मंगरुळपीर येथील सामाजिक कार्यकर्ते हिरामन निवृत्ती इंगोले यांच्याशी त्यांच्या जीवनप्रवासासह कार्यकतृत्वाची माहिती जाणून घेण्यासाठी साधलेला  संवाद...... 

प्रश्न: शिक्षणसंस्था सुरु करण्याचा विचार मनात कसा आला ? उत्तर: डोळ्यांनी अंध असताना लहानपणी विविध ठिकाणी काम करताना गरीबांच्या विदारक स्थितीच्या चर्चा कानावर पडत होत्या. शिक्षणाअभावी त्यांना काय अडचणी येत आहेत. ते कळले होते. त्यामुळेच शाळा उघडून गरिबांच्या मुलांना शिक्षण देण्याचा निर्धार केला होता. 

प्रश्न: शिक्षण संस्था उभारताना आलेल्या अडचणींचा सामना कसा केला ?उत्तर: विचार आणि निर्णय चांगला असला की, ध्येय गाठणे कठीण नसते. सुरुवातीच्या काळात शाळेची मान्यता मिळविण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा केला. त्यात काही लोकप्रतिनिधींचे सकारात्मक सहकार्य मिळाले आणि मान्यता मिळाल्यानंतर संत गाडगे महाराज प्राथमिक शाळेचा (पहिली ते सातवी) श्रीगणेशा झाला. त्यानंतर विविध स्वरुपात समाजातील विविध लोकांनी मदत केली. त्यामुळे फारशा अडचणी आल्याच नाहीत!

प्रश्न: शिक्षण संस्थेत काही सुधारणा केल्या का ?उत्तर: गरीबांच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी केवळ शाळा सुरू करून चालणार नव्हते, तर त्यांच्या आर्थिक अडचणींचा विचार करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात कायम ठेवणे, हेसुद्धा मोठे आवाहन होते. सुरुवातीला ताट्यांच्या आधारे सुरू केलेली शाळा आता इमारतीत परावर्तित केली आहे. त्याशिवाय मुलांसाठी वसतीगृहही सुरू केले आहे. पुढे या गरीब विद्यार्थ्यांना आमच्या शाळेत संगणक शिक्षणही देण्याचा मानस आहे.  शिक्षकांकडून नाही घेतली दमडी !अनेक खासगी संस्था शिक्षक भरती करताना लाखो रुपये देणगी त्यांच्याकडून घेतात; परंतु हिरामन इंगोले यांनी त्यांच्या अनुदानित शाळेवर शिक्षकांना कायम करताना एक रुपयाही देणगी स्वीकारली नाही. स्वत: अंध असूनही गरिबांच्या लेकरांना शिक्षणाची दारे खुली करून देण्याचे धाडस हिरामण यांनी करून दाखविले, त्याचप्रमाणे गोरगरीब होतकरू युवकांना संस्थेत शिक्षक म्हणून रुजू करून घेतले

टॅग्स :washimवाशिमinterviewमुलाखतEducation Sectorशिक्षण क्षेत्र