शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

पतंग उडविताना खबरदारी घ्या - सामाजिक संघटनांनी केले आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 12:49 IST

वाशिम :  मकरसंक्रांतीनिमित्त शहरामध्ये मोठया प्रमाणात पतंग उडविल्या जात असल्याने जागोजागी शहरात दुकाने थाटली आहेत. पतंग उडविताना मात्र अनेक अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने खबरदारी घेण्याचे आवाहन विविध सामाजिक संघटनांच्यावतीने केल्या जात आहे.

ठळक मुद्देमकर संक्रांतीनिमित्त पतंगोत्सव पतंगांच्या दुकानांची रेलचेल

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  मकरसंक्रांतीनिमित्त शहरामध्ये मोठया प्रमाणात पतंग उडविल्या जात असल्याने जागोजागी शहरात दुकाने थाटली आहेत. पतंग उडविताना मात्र अनेक अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने खबरदारी घेण्याचे आवाहन विविध सामाजिक संघटनांच्यावतीने केल्या जात आहे.जिल्हयात विविध कॉलनीमध्ये पतंगोत्सव सुरू झाला असून आकाशात मोठया प्रमाणात पतंग उडतांना दिसून येत आहेत. मात्र पतंग उडविण्याासाठी वापरण्यात येत असलेला दोरा, मांजा घातक असून मांजामध्ये विविध रासायनिक द्रव्य, काच टाकल्या जात असल्याने ते आरोग्यास धोकादायक आहे. पतंगासाठी वापरण्यात येत असलेल्या दोºयाने अनेकांची बोटे कापली जात आहेत. पतंग उडवितांना तो उत्सव म्हणून साजरा करा असे आवाहन विविध सामाजिक संघटनाकडून केल्या जात आहे. तसेच याबाबत जनजागृतीही केल्या जात आहे. पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येत असलेला दोरा (मांजा) शरीरासाठी घातक असल्याने याचा वापर टाळावा व कपडे शिवण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या दोºयाचा वापर करावा. या संदर्भात विविध संघटना शहरात फलके लावून जनजागृती करीत असतांना दिसून येत आहेत.‘मांजा’मुळे पक्ष्यांच्या जिवित्वास धोकाआधिच विविध मोबाईल कंपन्यांच्या टॉवरमुळे पक्ष्यांच्या संख्येत मोठया प्रमाणात घट झाली आहे. चिमणींचा शोध घेता दिसून येत नाही. पतंग उडविण्यसासाठी वापरण्यात येत असलेला दोरा (मांजा) विजेच्या तारांवर, झाडांवर गुुंतून राहत असल्याने याचा पक्ष्यांच्या जिवित्वास धोका निर्माणझाला आहे. पक्षी या दोºयामध्ये अडकून त्यांचा जीवही जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे साधा दोरा वापरण्याचे आवाहन सावली प्रतिष्ठानचे राम धनगर यांनी केले.पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या दोºयाला कनिक, फेविकॉल किंवा चिक्कीचा वापर करून काचाची भुकटी लावण्यात येते. तसेच काही रासायनिक द्रव्य मिसळूनही ‘मांजा ’ तयार केला जातो . सदर मांजा आरोग्यासाठी घातक आहे.बालकांसाठी कार्टून पतंगबाजारात लागलेल्या दुकानांमध्ये बालकांसाठी विशेष पतंग विक्रीस आले आहेत. यामध्ये बेन टेन, डयूक अ‍ॅन्ड डोनॉल्ड, शक्तीमान, भिम यांच्यासह कार्टून पात्राचे चित्र पतंगवर आहे.पतंगासाठी वापरण्यात येत असलेल्या दोºयामध्ये रासायनिक द्रव्यांचा अवलंब होत आहे. पूर्वी तयार केल्या जाणाºया मांजापेक्षा तो त्वचेसाठी हानीकारक आहे. तो न वापरणेच बरे.- डॉ. अनिल कावरखेवैद्यकीय अधिकारी, जिसारू, वाशिम

टॅग्स :khamgaonखामगाव