वाशिम: भाजपचे माजी प्रदेश कार्यकारिणी सदस्य वसंत धाडवे यांच्याविरूद्ध खोट्या तक्रारी करणार्यांवर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकार्यांना पत्राद्वारे दिले आहेत. वसंत धाडवे यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदन देऊन त्यांच्याविरुद्ध खोट्या तक्रारी करण्यात आल्या असल्याचे निवेदन दिले. निवेदनानुसार, माझ्या संस्थेच्या विरोधात खोट्या तक्रारी करून मला ब्लॅकमेल करून खंडणी घेताना रंगेहात पकडलेल्या संजय वैरागडे, भाऊराव खंडारे, माणिक बांगर यांच्यावर गुन्हा दाखल झाला. त्यामुळे त्यांनी तुमच्या संस्थेविरोधात खोट्या तक्रारी करू, अशी धमकी दिली. त्यामुळे या व्यक्तींकडून माझ्या विरोधात खोट्या तक्रारी करून मला जीवे मारण्याची धमकी देण्यात येत आहे. त्यामुळे मला पोलीस संरक्षण देऊन संबंधितांविरोधात योग्य कारवाई करण्याची मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. त्यांच्या निवेदनाची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकार्यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
धाडवे यांच्याविरूद्ध खोट्या तक्रारी करणा-यांवर कारवाई करा!
By admin | Updated: March 1, 2016 01:14 IST