निवेदनात नमूद केले आहे की, महावितरण ही तळागाळातील सर्वसामान्यांना विद्युत पुरवठा करणारी कंपनी आहे. तांत्रिक कामगारांना थकबाकी वसूल करण्याचे काम वरिष्ठांच्या आदेशानुसार देण्यात आले आहे. हे काम करित असताना अपराधी वृत्तीच्या विज ग्राहकांकडून तांत्रिक कामगारांवर जिवघेणा हल्ला, शिविगाळ, मारहाण, शासकीय कामात अडथळा आणल्याच्या घटना घडत आहेत. तक्रारी दाखल होतात; पण आरोपीवर कठोर कारवाई मात्र केली जात नाही, त्यात दिरंगाई होते. कारवाईची गती वाढवून न्याय द्यावा, असे निवेदनात नमूद आहे. तथापि, महावितरण कर्मचारी बाळू आडे, बाळू मारकड यांच्यावर हल्ला करणाºया आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तांत्रिक कामगार युनियनचे प्रादेशिक सचिव प्रभाकर लहाने, झोनल सचिव गणेश गंगावणे, माजी झोन अध्यक्ष पी.जी. राठोड, सर्कल अध्यक्ष शेख अनवर, सर्कल सचिव किरण कºहाळे, विभागीय अध्यक्ष जी.आर. पोदाडे, विभागीय सचिव प्रकाश ठाकरे यांनी केली आहे.
कामगारांना मारहाण करणाºयांवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:18 IST