शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

पाणीटंचाईसंदर्भात घागरफोड आंदोलन

By admin | Updated: May 24, 2016 01:52 IST

वाशिम नगर परिषदने उपाययोजना करण्याची मागणी.

वाशिम: शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात असर्मथ ठरल्याचा आरोप करीत, नगर परिषदेच्या धोरणाचा विरोध म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने वाशिम नगर परिषद कार्यालयासमोर २३ मे रोजी घागरफोड आंदोलन करण्यात आले. शहरात उद्भवलेली भीषण पाणीटंचाई, एकबुर्जी धरणातील मृत जलसाठा व खासगी टँकरधारकांकडून होणारी आर्थिक लूट आदींच्या पृष्ठभूमीवर शहरातील सर्व विहिरी व बोअरवेल अधिग्रहित करून प्रत्येक प्रभागात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने न.प. मुख्याधिकार्‍यांना निवेदन देऊन केली होती; मात्र नगर परिषदेने यासंदर्भात कोणतीच कार्यवाही न केल्यामुळे मनसेच्या वतीने जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्‍वर जाधव यांच्या नेतृत्वात घागरफोड आंदोलन केले. या आंदोलनात मनसेचे शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला पदाधिकारी सहभागी झाले होते. आंदोलनकर्त्यांनी नगर परिषद कार्यालयासमोर घागर फोडून नगर नागरिकांना खासगी टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी केली. यावेळी मनसेचे निवेदन स्वीकारण्यास नगर परिषदेमध्ये एकही जबाबदार अधिकारी हजर नव्हता. वाशिम नगर परिषदेचा ह्यबह्ण वर्ग दर्जा असून शहरातील नागरिकांना स्वखर्चाने टँकरने पाणीपुरवठा करण्याचा अधिकार नगर परिषदेचा आहे. यासंदर्भातील शासन निर्णयही न.प.ला देण्यात आलेला आहे; मात्र मुख्याधिकार्‍यांना शहरातील नागरिकांच्या समस्यांशी काहीही देणे- घेणे नाही, असा आरोप जिल्हाध्यक्ष जाधव यांनी केला. नगर परिषदेने नागरिकांना पाणीपुरवठा न केल्यास यापुढे अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही ज्ञानेश्‍वर जाधव यांनी दिला.