शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

गुरुवारपासून ४९१ ग्रामपंचायतींमध्ये ‘स्वच्छता ही सेवा’ मोहिम!

By संतोष वानखडे | Updated: September 13, 2022 14:12 IST

गाव स्वच्छ व सुंदर बनविण्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील ४९१ ग्रामपंचायतींमध्ये १५ सप्टेंबरपासून ‘स्वच्छता ही सेवा’ मोहिम राबविण्यात येणार आहे.

वाशिम :

गाव स्वच्छ व सुंदर बनविण्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील ४९१ ग्रामपंचायतींमध्ये १५ सप्टेंबरपासून ‘स्वच्छता ही सेवा’ मोहिम राबविण्यात येणार आहे. या दरम्यान सर्वांनी गावाच्या दृष्यमान स्वच्छतेसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी मंगळवारी (दि.१३) केले.१५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा’ अंतर्गत गावांमध्ये दृष्यमान स्वच्छतेसाठी एक राज्यव्यापी मोहीम राबविण्याबाबत केंद्र व राज्य शासनाकडून जिल्हा परिषद प्रशासनाला सूचना प्राप्त झालेल्या आहेत. यावर्षी ‘गावांची दृष्यमान स्वच्छता’ ही या मोहिमेची थीम ठरविण्यात आली आहे. गावांमध्ये ‘दृष्यमान स्वच्छता’ राखली जावी, यासाठी गावातील कचराकुंड्या व असुरक्षित ठिकाणांची साफसफाई करावी लागणार आहे. या मोहिमेदरम्यान गावातील सुका व ओला कचरा विलगीकरणासाठी व्यापक प्रमाणात जनजागृतीवर भर राहणार आहे. प्लास्टिक सारखा अविघटनशील कचरा एकत्रित करून त्याचे स्वतंत्र नियोजन करावे, पाणवठ्याजवळील परिसर स्वच्छ ठेवून त्याच्या सभोवताली वृक्षारोपण करणे, एकल  प्लास्टिक वापराच्या (सिंगल युज प्लॅस्टिक) दुष्परिणामाबद्दल सभा आयोजित करून यापूर्वी अशा प्लास्टिक वापरावर बंदीबाबत घेतलेल्या ठरावाची अंमलबजावणी करणे, हागणदारीमुक्त अधिक घटकांवर सरपंच संवाद आयोजित करणे आदी उपक्रम राबविण्याच्या सूचना जिल्हा परिषद प्रशासनाने दिल्या.