चेस इन स्कूल या बुद्धिबळासाठी राष्ट्रीय स्तरावर शाळांमध्ये प्रशिक्षण देण्याकरिता विशेष परीक्षेचे आयोजन देशातील सर्व राज्यांमध्ये करण्यात आले होते. यासाठी विविध गटांमध्ये खेळाडूंचे वर्गीकरण करण्यात आले होते. यामध्ये राहुल सावळे यांचासुद्धा समावेश करण्यात आला होता. या गटाला ग्रँडमास्टर प्रवीण थिपसे व आंतरराष्ट्रीय मास्टर शरद तिला यांनी मार्गदर्शन केले. सदर शिबिराचे आयोजन ऑनलाइन ७ ते ९ एप्रिल दरम्यान करण्यात आले होते. परीक्षेत देशातून फक्त साधारण सतरा टक्के विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. ३ मे रोजी झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील ऑनलाइन परीक्षेचा निकाल ४ जून रोजी जाहीर करण्यात आला. यामध्ये राहुल सावळे याने यश संपादन केले आहे. राहुल यास ग्रॅण्डमास्टर अभिजित कुटे यांचे मार्गदर्शन लाभले.
राष्ट्रीय बुद्धिबळ प्रशिक्षक परीक्षेत सावळेंचे सुयश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:27 IST