रिसोड (जि. वाशिम): रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासक नियुक्तीला नागपूर उच्च न्यायालयाने ५ मार्चला स्थगिती दिली. त्यामुळे सध्याच्या संचालक मंडळासह उपसभापतीपदी भगवानराव बोरकर कायम राहणार आहेत. बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत संपल्याने जिल्हा उपनिबंधक खाडे यांनी बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करून रिसोड बाजार समि तीवर प्रशासक म्हणून सहायक निबंधक बी.एन. कोकाटे यांची नियुक्ती केली होती. त्या नियुक्ती आदेशाच्या विरोधात बाजार समितीचे प्रभारी सभापती भगवानराव बोरकर यांनी उच्च न्यायालय खंड पीठ नागपूर येथे पिटीशन नं.११९९/२0१५ याचिका दाखल केली होती.
बाजार समिती प्रशासक नियुक्तीला स्थगिती
By admin | Updated: March 9, 2015 02:18 IST