गिरोली (जि. वाशिम) : मानोरा तालुक्यातील गिरोली येथील महादेव किसन खोराटे (२५) या युवकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना २२ मे रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. दरम्यान, मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आल्याने आत्महत्या की घातपात, याबाबत शंकाकुशंका व्यक्त केली जात आहे. गिरोली येथील ऑटोचालक महादेव खोराटे याचा मृतदेह शेतातील कडूनिंबाच्या झाडाला हात पाठीमागे बांधून आणि गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. या प्रकरणी गणेश नामदेव ढोरे यांनी मानोरा पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत असे नमूद केले आहे, की महादेव खोराटे यांनी त्याच्या स्वत:च्या शेतात जाऊन नॉयलॉनच्या दोरीने हात पाठीमागे बांधून निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, मानोरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार कुंदनकुमार वाघमारे यांच्या मार्गदशर्नात पोलीस अधिक तपास करीत आहेत.
गिरोली येथील युवकाचा संशयास्पद मृत्यू
By admin | Updated: May 23, 2016 01:27 IST