शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण थातूरमातूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 14:43 IST

गेल्या ४ वर्षांपासून वाशिम जिल्ह्यात शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण थातूरमातूर स्वरुपात उरकले जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : समाजातील प्रत्येक मुलास शिक्षणाचा हक्क प्रदान करण्यात आल्याच्या वल्गना एकीकडे शासनस्तरावरून केली जात असताना, दुसरीकडे मात्र ४ जुलै २०१५ चा अपवाद वगळता गेल्या ४ वर्षांपासून वाशिम जिल्ह्यात शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण थातूरमातूर स्वरुपात उरकले जात आहे. यामुळे अनेक मुले आजही शिक्षणापासून वंचितच असल्याची माहिती सूत्रांनी दिली.बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अंतर्गत ६ ते १४ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकास शाळेच्या पटावर नोंदविले जाणे, त्याने नियमित शाळेत येणे आणि त्याला दर्जेदार शिक्षण मिळणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. त्यानुसार, एकही मूल शाळाबाह्य राहता कामा नये, असे शालेय शिक्षण विभागाचे सक्तीचे निर्देश आहेत. त्यानुषंगाने दरवर्षी शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुषंगाने महाराष्ट्र सरकारच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत शाळाबाह्य मुलांबाबत सार्वत्रिक सर्वेक्षण करण्याचा अध्यादेश सन २०१५ मध्ये काढण्यात आला होता. महसूल, ग्रामविकास, नगरविकास, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, महिला व बालविकास, कामगार विभाग, आदिवासी विकास, अल्पसंख्याक विकास विभाग आणि सार्वजनिक आरोग्य या विभागांच्या सहकार्य आणि समन्वयातून ४ जुलै २०१५ रोजी एकाच दिवशी राज्यभरासह वाशिम जिल्ह्यातही शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले; मात्र तेव्हापासून दरवर्षी शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाचा केवळ देखावा केला जात असून याकडे शिक्षण विभागाचे पुरते दुर्लक्ष होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. केवळ २५० कुटूंबांजवळ आहे शिक्षण हमी कार्डकुटूंबाचा उदरनिर्वाह भागविण्यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर कराव्या लागणाºया कुटूंबातील मुलांना कुठेही शिक्षण मिळण्यासाठी शिक्षण हमी कार्ड वाटप करण्यात आले आहेत; मात्र असे कार्ड एकमेव मानोरा तालुक्यातील केवळ २५० कुटूंबांकडेच असल्याची माहिती प्राप्त झाली.

टॅग्स :washimवाशिमEducation Sectorशिक्षण क्षेत्र