शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

नुकसानग्रस्त शेतीचे सर्व्हेक्षण करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 20:25 IST

वाशिम जिल्ह्यात यावर्षी सर्वात कमी पाऊस झाल्यामुळे पिकांची स्थिती अत्यंत वाईट आहे. प्रदिर्घ विश्रांतीनंतर आलेल्या पावसामुळे सोयाबिन पिकांवर अळींचा प्रादूर्भाव, पिक करपल्याच्या घटना; तर काहीठिकाणी सोयाबिन पिकाला शेंगाच लागल्या नसल्यामुळे शेतकºयांवर मोठे संकट ओढवले आहे. यासाठी संबंधित यंत्रणेला सर्व्हे करण्याचे आदेश देऊन तत्काळ अहवाल सादर करण्याबाबत निर्देश द्यावे, अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष आ.राजेंद्र पाटणी यांनी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्याकडे केली. 

ठळक मुद्देवाशिम जिल्ह्यात कमी पाऊस झाल्यामुळे पिकांची स्थिती अत्यंत वाईट सोयाबिन पिकांवर अळींचा प्रादूर्भाव, शेतक-यांवर मोठे संकट सर्व्हे करण्याचे आदेश देऊन तत्काळ अहवाल सादर करण्याबाबत निर्देश 

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड: वाशिम जिल्ह्यात यावर्षी सर्वात कमी पाऊस झाल्यामुळे पिकांची स्थिती अत्यंत वाईट आहे. प्रदिर्घ विश्रांतीनंतर आलेल्या पावसामुळे सोयाबिन पिकांवर अळींचा प्रादूर्भाव, पिक करपल्याच्या घटना; तर काहीठिकाणी सोयाबिन पिकाला शेंगाच लागल्या नसल्यामुळे शेतकºयांवर मोठे संकट ओढवले आहे. यासाठी संबंधित यंत्रणेला सर्व्हे करण्याचे आदेश देऊन तत्काळ अहवाल सादर करण्याबाबत निर्देश द्यावे, अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष आ.राजेंद्र पाटणी यांनी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्याकडे केली. यासंदर्भातील निवेदनात पाटणी यांनी पुढे नमूद केले आहे की, कारंजा तालुक्यासोबतच जिल्हयातील इतर भागांचा पिक पाहणी दौरा केला असता अनेक शेतकºयांनी त्यांच्या व्यथा मांडल्या. तिन महिन्यात येणाºया पिकांच्या पेरणीस यावर्षी जिल्ह्यातील शेतकºयांनी सर्वाधिक पसंती दिली. मात्र, तब्बल महिना ते १५-२० दिवसानंतर असलेल्या अल्प पावसामुळे सोयाबीन, उडीद व मुगासारखी पिके रोगराईला बळी पडली. अनेक भागात सोयाबिन पिकाला शेंगाच आल्या नसल्याच्या घटनात वाढ झाली. हजारो हेक्टरवरील खरिपाचे पिक पुर्णत: करपुन गेले असुन अशातच अर्धवट करपलेली पिके तरली असली तरी वातावरणातील बदलामुळे पिकांवर रोगराई पसरली आहे.     संपुर्ण तालुक्यात प्रारंभी बरसलेल्या पावसावर खरीपाची पेरणी केली. मात्र, त्यानंतर महिनाभर पावसाने दडी मारल्याने खरीपाच्या पिकांना मोठा फटका बसला आहे. पावसाने ओढ दिल्यामुळे उंट अळीचा प्रादूर्भाव झाल्याने तालुक्यातील अनेक  गावात सोयाबिन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसाअभावी संपुर्ण खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असुन या पिकांच्या नुकसानीचे शासनामार्फत तातडीने पंचनामे करण्यात यावे, अशी मागणी शेतकºयांकडून करण्यात येत आहे. पाहणीसाठी शेतकºयांच्या बांधावर स्वत: गेलो असता अनेक शेतकºयांनी आपल्याकडे त्यांच्या व्यथा मांडल्या. शेतकºयांच्या मते सप्टेंबर महिन्यापासुन रब्बीच्या पेरणीस सुरूवात होणार असुन खरिप पिकांत झालेले नुकसान भरून काढण्यासाठी आपण स्वत: जातीने लक्ष घालुन शासनाच्या ही बाब निर्दशनास आणुन देण्याची मागणी केली. तसेच त्वरित पंचनामे करून आर्थिक मदतीची मागणी केली. कारंजा-मानोरा मतदार संघातील तसेच जिल्ह्यातील इतरही तालुक्याची भयावह परिस्थिती पाहता संबंधित यंत्रणेला सर्व्हे करण्याचे आदेश देऊन तत्काळ अहवाल सादर करण्याबाबत निर्देश द्यावेत, अशी मागणी पाटणी यांनी कृषिमंत्री फुंडकर यांच्याकडे केली आहे.