शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना...
2
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
3
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
4
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
5
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
6
पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार?
7
"माझ्यावर हसतोय?" कुर्ल्यात तरुणावर चाकूनं सपासप वार, भररस्त्यात घडलेल्या घटनेनं खळबळ!
8
पुतिन-ट्रम्प यांची फोनवर चर्चा; युरेनियम रशियाला देण्याची ऑफर अमेरिकेने नाकारली! इराणचं टेन्शन वाढलं
9
अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ प्राचीन मूर्ती, अमूल्य ठेव्याची एवढी आहे किंमत 
10
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! उद्या शेअर बाजारात कामकाज होणार का? ट्रेडिंगपूर्वी चेक करा नवं हॉलिडे कॅलेंडर
11
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
12
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
13
खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव!
14
माचिसची काडी पेटवली अन् भडका उडाला, सिलेंडरच्या स्फोटात कुटुंबातील ७ जण होरपळले
15
काय म्हणावं आता! लग्नात इतक्या जोरात डीजे वाजवला की १४० कोंबड्या मेल्या; मालक चिडला अन्...
16
Sonam Raghuvanshi : “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी
17
कर्ज फेडलं पण आता डूख धरून बसला पाकिस्तान; दुबईचा बदला घेणार, 'या' गर्भश्रीमंतला अटक करण्याची तयारी 
18
पुष्टिपती विनायक जयंती २०२६: नववर्षातील बाप्पाचा पहिला जन्मोत्सव; ‘या’ अवताराची कथा माहितीये का?
19
जिनिलियाने उलगडली 'राजा शिवाजी'च्या निर्मितीमागची गोष्ट; म्हणाली, "तडजोड केली नाही..."
20
सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी...
Daily Top 2Weekly Top 5

शिरपूर आरोग्य केंद्र बांधकामाची पाहणी

By admin | Updated: April 19, 2017 18:16 IST

शिरपूरजैन येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ३.१७ कोटी रुपयांच्या नविन ईमारत बांधकामाची पाहणी जिल्हा परिषद अध्यक्षांसह महिला व बालकल्याण सभापतींनी बुधवारी केली.

शिरपूरजैन : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ३.१७ कोटी रुपयांच्या नविन ईमारत बांधकामाची पाहणी जिल्हा परिषद अध्यक्षांसह महिला व बालकल्याण सभापतींनी बुधवारी केली.शिरपूर प्राथमिक आरोग्य केंद्राची पुर्वीची इमारत अतिशय तोकडी व सुविधा नसलेली होती. या आरोग्य केंद्रांतर्गत ३३ गावे आहेत. शौचालय नसणे, पुरेशा भौतिक सुविधांचा अभाव, पाणीटंचाई आदींमुळे रुग्णांना गैरसोयीला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे येथे नविन इमारत होणे गरजेचे होते. गत महिन्यात या केंद्राच्या नवीन इमारत बांधकामासाठीचे सर्व सोपस्कार पार पडल्याने १० एप्रिलपासून बांधकामाला रितसर सुरूवात झाली. बुधवार, १९ एप्रिल रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, सभापती यमुना जाधव, जि.प.चे उपअभियंता अपोतीकर आदींनी शिरपूर येथे भेट देऊन पाहणी केली.  शिरपूर आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावातील नागरिकांना आरोग्य सेवा अधिक दर्जेदार मिळण्यासाठी या आरोग्य केंद्रात आता आवश्यक त्या सर्व भौतिक सुविधा उपलब्ध होतील, असे सांगून आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम जलदगतीने करण्याच्या सूचना देशमुख यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या. आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू झाल्याने रुग्ण तपासणीत व्यत्यय निर्माण होऊ नये म्हणून ह्यओपीडीह्णची तात्पुरती पर्यायी व्यवस्था केली जाणार आहे. आंतररूग्ण व बाह्यरूग्ण तपासणीसाठी केल्या जाणाऱ्या पर्यायी व्यवस्थेची पाहणी हर्षदा देशमुख व यमुना जाधव यांनी केली. या आठवड्यात ही पर्यायी व्यवस्था पुर्णत्वाकडे नेण्याच्या सूचनाही संबंधितांना देण्यात आल्या.