शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना अनुदानित कृषी औजारांचा पुरवठा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 14:24 IST

वाशिम : उन्नत शेती समृध्दी अभियानांतर्गत शेतकऱ्यांना अनुदान तत्वावर विविध कृषि अवजारे, यंत्र वाटप केले जाणार आहे.

ठळक मुद्देकृषि अवजारे घेण्याकरीता कृषि विभागामार्फत अनुदान दिले जाणार आहे. किंमतीच्या ५० टक्के व इतर लाभार्थींसाठी किंमतीच्या ४० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. पात्र शेतकऱ्यांना २८ मे पर्यंत संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयाकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

वाशिम : उन्नत शेती समृध्दी अभियानांतर्गत शेतकऱ्यांना अनुदान तत्वावर विविध कृषि अवजारे, यंत्र वाटप केले जाणार आहे. पात्र शेतकऱ्यांनी कृषि विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिलेल्या अर्जाच्या नमुन्यात अटी व शर्तीच्या अधिन राहुन २८ मे २०१८ पर्यंत संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयाकडे अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी मंगळवारी केले.

मजुरांची वानवा बघता राज्य शासनातर्फे कृषि यांत्रिकीकरणास चालना दिली जात आहे. शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, मोगडा (कल्टीव्हेटर) सर्व प्रकाराचे प्लांटर (खत व बियाणे टोकण यंत्र) मळणी यंत्र, पॉवर बिडर, रिपर व रिपर कम बाईंडर, दालमिल व पूरक यंत्र संच (डि-स्टोनर, पॉलिशिंग, ग्रेडींग, पॅकिंग इ.) ट्रॅक्टरचलीत फवारणी यंत्र (बूम स्प्रेअर) मिस्ट ब्लोअर, सबसॉइलर इत्यादी कृषि अवजारे घेण्याकरीता कृषि विभागामार्फत अनुदान दिले जाणार आहे. ट्रॅक्टरकरीता अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व अल्प, अत्यल्प भूधारकशेतकरी व महिला लाभार्थींसाठी उच्चतम अनुदान मर्यादेत किंमतीच्या ३५ टक्के किंवा १.२५ लाख व इतर लाभार्थींसाठी किंमतीच्या २५ टक्के किंवा एक लाख तसेच इतर अवजारांकरीता अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीसाठी, अल्प-अत्यल्प भू धारक शेतकरी व महिला लाभार्थींसाठी किंमतीच्या ५० टक्के व इतर लाभार्थींसाठी किंमतीच्या ४० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. कृषि यांत्रिकीकरणाकरीता विविध योजनेअंतर्गत जिल्ह्यास प्राप्त होणाऱ्या निधीच्या लक्षांकाच्या मर्यादेत  लाभार्थींची निवड करण्यात येईल. प्रत्येक अवजांरासाठी शेतकऱ्यांनी विहित नमुन्यात स्वतंत्र अर्ज करणे आवश्यक असून ज्या अवजारास जास्तीत जास्त अनुदान देय आहे त्या एकाच यंत्र, अवजारास अनुदान दिले जाणार आहे.

पात्र शेतकऱ्यांना २८ मे पर्यंत संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयाकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे. जिल्ह्याला प्राप्त आर्थिक लक्षांकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास लाभार्थींची निवड तालुका हा घटक मानून सोडत पध्दतीने ८ जून २०१८ रोजी तालुकास्तरावर करण्यात येईल. अधिक माहितीसाठी कृषि सहाय्यक, कृषिपर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी अथवा कृषि विभागाच्या संकेतस्थळावरुन याबाबत माहिती घ्यावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी गावसाने यांनी केले.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती