शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

आला उन्हाळा; आरोग्य सांभाळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:37 IST

उन्हाळा सुरू झाल्यावर ऋतूतील झालेल्या बदलांमुळे विविध प्रकारचे आजार उद्भवतात. यामध्ये प्रामुख्याने त्वचाविकार तसेच उष्माघाताचा समावेश आहे. उन्हाळ्यात आरोग्य ...

उन्हाळा सुरू झाल्यावर ऋतूतील झालेल्या बदलांमुळे विविध प्रकारचे आजार उद्भवतात. यामध्ये प्रामुख्याने त्वचाविकार तसेच उष्माघाताचा समावेश आहे. उन्हाळ्यात आरोग्य सांभाळण्यासाठी प्रतिबंधक उपायांबरोबरच काही दक्षता आणि खाण्यापिण्यावर बंधने ठेवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. उन्हाळ्यामध्ये साधारणत: सर्वत्र जाणवणारा दाहक परिणाम म्हणजे उष्माघात. यामध्ये शरीराचे तापमान उच्च पातळीवर जाते. योग्य ते उपचार वेळेवर न मिळाल्यास संबंधित व्यक्ती दगावण्याची शक्यताही अधिक असते. जिल्ह्यात तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. उन्हामुळे शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होत असल्याने ओ.आर.एस., घरी बनविण्यात आलेली लस्सी, लिंबू पाणी, ताक आदींचा वापर नियमित करावा. तहान लागलेली नसली तरीसुद्धा जास्तीतजास्त पाणी प्यावे. उन्हापासून बचाव म्हणून नागरिकांनी आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

बॉक्स

अशी घ्यावी काळजी

हलके, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत.

बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, बुट व चपलांचा वापर करावा.

उन्हात काम करीत असलेल्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा.

अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

बाहेर कामकाज करीत असताना मध्ये-मध्ये ब्रेक घेऊन नियमित आराम करावा.

गरोदर महिला व आजारी व्यक्तींची अधिक काळजी घेण्यात यावी.

बॉक्स

काय करू नये

शरीरात पाण्याचे प्रमाण कमी करण्यास कारणीभूत असलेले चहा, कॉफी व कार्बोनेटेड थंड पेय यांचा वापर टाळावा.

दुपारी १२ ते ३.३० या कालावधीत बाहेर उन्हात जाण्याचे टाळावे.

गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे.

बाहेर तापमान जास्त असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत.

शिळे अन्न खाऊ नये आणि उच्च प्रथिने असलेले अन्न टाळावे.

बॉक्स

अतिनील किरणांचे त्वचेवर होणारे परिणाम

उन्हातील अतिनील म्हणजे अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळे त्वचेचे सर्वांत जास्त नुकसान होते. उन्हामुळे प्रमाणाबाहेर घाम आल्यास, घामातील खारट द्रवामुळे धर्मग्रंथींची नलिका सुजते व त्यातून होणारा घामाचा प्रवाह बंद होतो. त्यामुळे साठून राहणाऱ्या घामाचा दबाव वाढून ग्रंथी फुटतात व त्यातून घामोळे तयार होते. प्रखर उन्हामुळे त्वचा काळवंडणे, त्वचेवर चट्टे, व्रण उठणे आदी दुष्परिणाम जाणवतात.

००००

कोट बॉक्स

ऊन कडक तापत असल्यामुळे अशा उन्हात फिरल्यास उष्माघात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी उन्हाचा धोका लक्षात घेऊन दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळावे. अशक्तपणा, डोकेदुखी, ताप येणे, चक्कर येत असल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

- डॉ. अनिल कावरखे

वैद्यकीय अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय, वाशिम

००००

कोट बॉक्स

उन्हामुळे त्वचेवर परिणाम होतात. त्यामुळे नागरिकांनी शक्यतोवर उन्हात जाणे टाळावे. जास्त प्रमाणात घाम आल्यास घामोळ्या होण्याची दाट शक्यता असते. उन्हातील अतिनील किरणांचा त्वचेवर परिणाम होऊ नये म्हणून नागरिकांनी काळजी घ्यावी. काही लक्षणे आढळून येताच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

- डॉ. विठ्ठल गोटे,

त्वचारोग तज्ज्ञ, वाशिम