शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळी भुईमुगाची आवक वाढली, भाव घसरले

By admin | Updated: May 27, 2017 19:37 IST

उन्हाळी भुईमुगाची काढणी अंतिम टप्प्यात; शेतकरी निराश

वाशिम: उन्हाळी भुईमुगाची काढणी अंतिम टप्प्यात असून, यंदा या पिकाचे उत्पादन ब-यापैकी झाल्याने बाजार समित्यांमध्ये आवक वाढल्याचे दिसत आहे. तथापि, गतवर्षीच्या तुलनेत यंदा या वाणालाही खुप कमी भाव मिळत असल्याने शेतकरी निराश झाले आहेत. यंदा जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत उन्हाळी भुईमुगाचा पेरा दुप्पट झाला होता. गतवर्षी ३ हजार ३७४ हेक्टरवर भुईमुगाची पेरणी झाली होती. ते प्रमाण यंदा ६ हजार हेक्टरच्यावर गेले होते. त्यातच पोषक वातावरण आणि पाण्याची उपलब्धता असल्याने शेतकऱ्यांना या पिकाचे एकराला सरासरी पाच क्विंटल उत्पादन झाले. त्यामुळे तूर आणि सोयाबीनमध्ये फटका खाणारे शेतकरी उत्साही होते; परंतु त्या उत्साहावरही बाजार व्यवस्थेने विरजन घातले आहे. मागील वर्षी प्रति क्विंटल ५ हजार ८०० रुपयांपर्यंत विकला जाणारा भुईमूग यंदा कमाल ४ हजार ६०० रुपये प्रति क्विंटल आणि सरासरी ३ हजार ९०० रुपये क्विंटलने घेतला जात आहे. त्यामुळे शेतकरी पूर्णपणे निराश झाले आहेत. दरम्यान, खरीपाचा हंगाम तोंडावर आला असल्याने या हंगामासाठी हाती पैसा असावा म्हणून शेतकऱ्यांनी भाव वाढीच्या अपेक्षेने घरात साठवलेले धान्य विकण्याची तयारी केली असून, नुकत्याच काढलेल्या भुईमुगाची विक्रीही करण्याची घाई त्यांना झाली आहे. त्यामुळे बाजारात भुईमुगाची आवक वाढली आहे. एकट्या कारंजा येथील बाजार समितीमध्ये २६ मे रोजी तब्बल पाच हजार क्विंटल भुईमुगाची आवक झाली होती.