शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

‘पोकलेन’अभावी रखडली सुजलाम, सुफलामची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 17:25 IST

मंगरुळपीर तालुक्यातील तीन आणि मानोरा तालुक्यातील एका शेततळ्याचे काम ५० टक्क्यांपर्यंम पूर्ण झाले आहे. आता पुढील खोदकामासाठी पोकलेन मशीन आवश्यक असताना त्या उपलब्ध न झाल्याने कामात खोडा निर्माण होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात सुजलाम, सुफलाम अभियान वेगाने राबविण्यात येत आहे. ग्रामपंचायती आणि प्रशासकीय यंत्रणाही उत्साहाने ही कामे करीत असून, मंगरुळपीर तालुक्यातील तीन आणि मानोरा तालुक्यातील एका शेततळ्याचे काम ५० टक्क्यांपर्यंम पूर्ण झाले आहे. आता पुढील खोदकामासाठी पोकलेन मशीन आवश्यक असताना त्या उपलब्ध न झाल्याने कामात खोडा निर्माण होत आहे.  पाणीटंचाईमूक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकारण्यासाठी शासन आणि भारतीय जैन संघटनेच्या (बीजेएस) सामंजस्य करारातून सुजलाम, सुफलाम अभियान राबविण्यात येत आहे. या कामांसाठी ग्रामस्थांसह प्रशासकीय यंत्रणाही झपाटली असून, या अभियानात सुरुवातीला मागे पडलेल्या रिसोड तालुक्यातही सीसीटीची कामे वेगाने करण्यात येत आहेत. याच अभियानांतर्गत जिल्ह्यात ४६ शेततळी आणि ३ वनतळी करण्यात येत असून, यातील मंगरुळपीर तालुक्यात चांभई, पिंपळखुटा, तसेच मानोरा तालुक्यातील सोमनाथ नगर येथे सुरू असलेल्या शेततळ्यांचे काम जेसीबी मशीनच्या आधारेच ५० टक्के पूर्ण झाले आहे. आता पुढे शेततळे खोदण्यासाठी पोकलेन मशीनची नितांत गरज असून, जिल्हा प्रशासनाने या संदर्भात बीजेएसचे जिल्हा समन्वयक शिखरचंद बागरेचा यांना पत्र पाठवून ३० पोकलेन मशीन उपलब्ध करण्याची मागणीही केली असून, मशीन उपलब्ध करण्यासाठी बीजेएसच्यावतीने युद्धपातळीवर प्रयत्नही करण्यात येत आहेत. तथापि, मशीन उपलब्ध होत नसल्याने जलसंधारणाच्या कामांत खोडा निर्माण होत आहे.

टॅग्स :washimवाशिमWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा