शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव येथील शिबिरात शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांनी मांडल्या व्यथा! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 16:21 IST

मालेगाव : महाराजस्व अभियानांतर्गत मालेगाव तहसिल कार्यालयात आयोजित विशेष शिबिरात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांनी आपल्या व्यथा मांडल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : महाराजस्व अभियानांतर्गत मालेगाव तहसिल कार्यालयात आयोजित विशेष शिबिरात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांनी आपल्या व्यथा मांडल्या. या कुटुंबियांच्या व्यथा जाणून घेतल्यानंतर त्यांचे प्रश्न महिनाभरात निकाली काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन तालुका प्रशासनातर्फे देण्यात आले. शिबिराला आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबातील २८ कुटूंबातील सदस्यांची उपस्थिती होती. शेतकरी आत्महत्याग्रस्तांचे प्रमाणपत्र मिळणे, सातबारावर वारसा चढविणे, बँकेतील कर्ज मिळणे, सिंचन विहीर व घरकुलांचा लाभ मिळणे, निराधार योजनेअंतर्गत दरमहा अनुदान मिळणे, व्यवसायाकरिता दुधाळ जनावरे, शिलाई मशीन मिळणे, स्वयंरोजगाराकरिता मदत मिळणे, मुद्रा लोन, विद्यार्थ्यांची खाजगी शाळेची फी माफ करणे, पिक विमा मिळणे, रेशनकार्ड मिळणे, विद्युत पुरवठा मिळणे इत्यादी समस्या मांडण्यात आल्या. विविध योजनांचा लाभ मिळण्याची मागणी करण्यात आली. सर्वांच्या समस्या नोंदवून महिनाभरात निराकरण करण्याबाबत संबंधित विभागाला सुचना देवून कळविण्यात आले. याप्रसंगी सर्वांना शासनाच्या विविध विभागाच्या वेगवेगळया योजनांची माहिती संबंधित विभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांचेमार्फत देण्यात आली.यावेळी निवासी नायब तहसिलदार रवि राठोड यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. शिबीर यशस्वी करण्यासाठी  अव्वल कारकून महादेव चिमणकर, रंजना गोरे व इतर कार्यालयीन कर्मचाºयांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :washimवाशिमMalegaonमालेगांव