वाशिम : मांगल्य, पावित्र्य , हर्षोल्हास, जीवनात आनंद व प्रकाश पसरविणारा दिवाळीचा सण एका दिवसावर येऊन ठेपला आहे. तत्पूर्वी रेशनचे धान्य खरेदी करण्यासाठी रेशन दुकानांमध्ये जाणार्या लाभार्थींना काही प्रमाणात साखर मिळत आहे. मात्र, पामतेल (खाद्यतेल) मिळत नसल्याने यावर्षीही सर्वसामान्यांची तेलाची फोडणी महागच राहणार आहे.महागाईचा भडका दिवाळीत गोरगरीबांचे ह्यदिवाळंह्ण काढत असतानाच, स्वस्ताचे पामतेलही या भडक्यात ह्यतेलह्ण टाकण्याचे काम करीत असल्याचे वास्तव समोर येत आहे. शिधापत्रिकेवरुन गायब असलेले पामतेल यंदाच्या दिवाळीतही शिधापत्रिकाधारकांना मिळणार नाही. दुसरीकडे गतवर्षी न मिळालेली साखर मात्र यंदाच्या दिवाळीत शिधापत्रिकाधारकांना माणसी अर्धा किलो या प्रमाणे साखर मिळणार असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी आर.आर. मिस्किन यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना स्पष्ट केले. साखर मिळणार असल्याने दिवाळीतील गोडवा वाढेल, यात शंका नाही. गहू, तांदूळ, रॉकेल, गॅस आदींचा मुबलक कोटा उपलब्ध असल्याने आनंद द्विगुणीत आहे. जिल्ह्यात किमान ५00 किलोमीटर पामतेलाची मागणी आहे. मात्र रेशनवरील खाद्यतेल गायबच आहे. गतवर्षीही दिवाळीदरम्यान पामतेल मिळालेच नव्हते. वरिष्ठ स्तरावरूनच पामतेल येत नसल्याने आमचा नाईलाज आहे, असे पुरवठा विभागाचे म्हणणे आहे. वरिष्ठ स्तरावरूनच रेशनचे पामतेल वाटप बंद करण्याचा घाट तर घातला जात नाही ना? अशी शंका गोरगरीब लाभार्थींमधून व्यक्त केली जात आहे.
साखरेचा गोडवा कायम, पण तेलाची फोडणी गायब!
By admin | Updated: October 22, 2014 00:33 IST