शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

सायकल द्वारा डवरणीचा यशस्वी प्रयोग; एका दिवसात दहा एकर शेतीत डवरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 13:23 IST

शेलुबाजार (जि. वाशिम)  : शेतकऱ्यांचा आधुनिक शेतीकडे कल दिवसेंदिवस वाढत आहे. पूर्वी पाणी सुरु झाले तर ते थांबेपर्यंत शेती कामे करण्याची प्रतिक्षा करावी लागत होती, यावर तोडगा काढीत गोगरी येथील शिव मल्हार गृपने पावसातही डवरणी करण्याचा यशस्वी प्रयोग केला.

ठळक मुद्दे शेत ओलसर असले तरी सुद्धा सदर डवरणी करता येवू शकते. ग्रुपमध्ये आठ सदस्य असुन एका दिवसात ते सरासरी दहा एकर डवरणी करीत आहेत.

- साहेबराव राठोड 

शेलुबाजार (जि. वाशिम)  : शेतकऱ्यांचा आधुनिक शेतीकडे कल दिवसेंदिवस वाढत आहे. पूर्वी पाणी सुरु झाले तर ते थांबेपर्यंत शेती कामे करण्याची प्रतिक्षा करावी लागत होती, यावर तोडगा काढीत गोगरी येथील शिव मल्हार गृपने पावसातही डवरणी करण्याचा यशस्वी प्रयोग केला. या प्रयोगाव्दारे एका दिवसात दहा एकर शेतीत डवरणी केली जाऊ शकते. तसा प्रयोगही त्यांनी शेलुबाजार परिसरातील एका शेतकऱ्यांच्या शेतात करुन दाखविला. या गृपच्या प्रयोगाचे सर्वत्र कौतूक केल्या जात आहे.          हिरंगी येथील शेतकरी सतिष सावके यांच्याकडील शेतात शेतात तनकट जास्त प्रमाणात वाढल्याने सोयाबीनला डवरणी  करायची होती. डवरणी करण्यासाठी बैलजोड़ी नाही, असती तरी सुध्दा बैलजोडीने गत दहा दिवसापासुन संततधार सुरु असल्याने ते शक्यही नव्हते.  यावेळी त्यांनी सहज  गोगरी येथील शिव मल्हार  ग्रुपच्या सदस्यांशी चर्चा केली. तेव्हा त्यांनी ही शक्कल लढवून सायकलव्दारे डवरणी केली. आता हा गृप याव्दारे रोजगारही मिळवत आहे. या डवरणीमुळे विशेष पिकाचे नुकसान होत नाही व ५० ते ६० हजार रूपयाची बैल जोडीची देखभाल करायची सुध्दा आवश्यकता नाही.  शेत ओलसर असले तरी सुद्धा सदर डवरणी करता येवू शकते. या ग्रुपमध्ये आठ सदस्य असुन एका दिवसात ते सरासरी दहा एकर डवरणी करीत आहेत. या गृपमध्ये गजानन साखरे,  गणेश साखरे , राजु कुटे , खंडुभाऊ पाबळे , संदिप दाडके , विष्णु साखरे , करण साखरे , महादेव काडे , अमोल कंकने यांचा समावेश आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती