शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

उपनिबंधकाच्या रडारवर अवैध सावकारी !

By admin | Updated: August 11, 2016 01:45 IST

वाशिम जिल्ह्यात ११0 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यातील एका प्रकरणात शेतक-याच्या बाजूने निर्णय घेण्यात आला.

संतोष वानखडे वाशिम, दि १0 : सावकाराने घर किंवा जमिन बळकाविल्याच्या तक्रारींचा ओघ जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे सुरू असून, एका प्रकरणात शेतकर्‍याच्या बाजूने निर्णय लागला आहे. सावकाराच्या ताब्यात असलेली जमिन मूळ मालक असलेल्या शेतकर्‍याला परत करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने दिले. या आदेशाची अंमलबजावणी होऊन ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संबंधित शेतकर्‍याचे नाव पुन्हा एकदा सात-बार्‍यावर आले आहे. कर्जासाठी विविध प्रकारच्या राष्ट्रीयकृत बँका, ग्रामीण व जिल्हा मध्यवर्ती बँक तसेच सहकारी पतसंस्थांची पाळेमुळे घट्ट रोवलेली असतानादेखील खासगी सावकारीचा धंदा जिल्ह्यात तेजीत असल्याचे अवैध सावकारांविरोधातच्या तक्रारीने समोर आणले आहे. आतापर्यंंत जिल्हा उपनिबंधक कार्यालयांकडे सावकाराने घर किंवा जमीन बळकावल्याच्या ११0 तक्रारी आल्या असून, १0 प्रकरणांची सुनावणी सुरू आहे.गत काही वर्षांंपासून निसर्गाची साथ मिळत नसल्याने शेतकरी विविध प्रकारच्या संकटात सापडले असल्याचे दिसून येते. कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे आणि शेती पिकविण्यासाठी शेतकरी पीककर्ज, बँकांचे कर्ज काढतो तर काही शेतकरी सावकारांकडून कर्ज घेतो. कर्जासाठी बँकांचे दर कमी आहेत. मात्र, प्रक्रिया किचकट असल्याने आणि सात-आठ चकरा मारल्यानंतरही पदरी निराशाच पडत असल्याने अनेकजण खासगी सावकारांकडे कर्जासाठी धाव घेतात. सावकार अधिकृत की अनधिकृत याचा विचार न करता कर्ज काढले जाते. तारण म्हणून सावकाराला जमिन किंवा मालमत्तेची खरेदी दिली जाते. खरेदीचा सर्व खर्च शेतकरी किंवा त्या ग्राहकाला पेलावा लागतो. कर्जाची परतफेड केल्यानंतर सावकाराने जमिन किंवा मालमत्तेची खरेदी पलटून देणे अपेक्षित आहे. मात्र, अनेक सावकार मालमत्ता पलटून देत नसल्याने पर्यायाने शेतकरी किंवा ग्राहकाला न्यायासाठी उपनिबंधक कार्यालयात धाव घ्यावी लागते. वाशिम जिल्हा उपनिबंधक कार्यालयात अवैध सावकाराने जमिन व मालमत्ता हडपल्यासंदर्भात एकूण ११0 तक्रारी आल्या आहेत. या तक्रारीत कितपत तथ्य आहे, याची पडताळणी करण्यासाठी सुरूवातीला तालुका उपनिबंधक कार्यालयाकडून संपूर्ण अहवाल बोलविला जातो. नंतर जिल्हा उपनिबंधक कार्यालयात जिल्हा उपनिबंधक याप्रकरणी सुनावणी घेतात. मंगरुळपीर तालुक्यातील पिंप्री बु. येथील पांडुरंग अमृता ठाकरे यांनीदेखील सावकाराने जमिन हडपल्याची तक्रार नोंदविली होती. याप्रकरणी तक्रारदार व गैरहजर यांची सुनावणी झाली.