शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
2
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
3
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, ७ दिवसांचा दिला अल्टिमेटम; नेमके प्रकरण काय?
4
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
5
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
6
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
7
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
8
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
9
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
10
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
11
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
12
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
13
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
14
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
16
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
17
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
18
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
19
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
20
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!

अनधिकृत बांधकाम थांबवा!

By admin | Updated: April 28, 2017 01:43 IST

नगरसेवकांची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी : पालिकेच्या परवानगीविनाच संकुलाचे बांधकाम

कारंजा लाड : नगर पालिका प्रशासनाची परवानगी न घेता शहरात व्यापारी संकुलाचे अनधिकृतपणे बांधकाम करण्यात येत आहे़ सदर बांधकाम थांबवून त्यावर हातोडा घालावा, अशी मागणी येथील तीन नगरसेवकांनी केली आहे़ यासंदर्भात त्यांनी २६ एप्रिल रोजी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.कारंजा नगर पालिका हद्दीत येणाऱ्या कृष्णा दाल मिल (भारत गॅस गोडाऊनजवळ) कसबे कारंजा नझुल शिट नं. २४ प्लॉट नं. दोनवर अनधिकृतपणे नवीन बांधकाम सुरू करण्यात आले आहे. कोणतेही बांधकाम करीत असताना महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन आणि नगर रचना नियमानुसार बांधकाम करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र, हा नियम डावलून सदर ठिकाणी विनापरवानगी (अनधिकृत) बांधकाम करण्यात येत आहे. अनधिकृतपणे बांधकाम करणाऱ्या रमाकांत उमाशंकर खेतान (रा.चार बंगला, गौरक्षण रोड, अकोला) व सैय्यद जाकीर अली सैय्यद इब्राहीम अली (रा. तीन बंगला, गंगानगर, अकोला) यांच्यावर महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन आणि नगररचना अधिनियम तरतुदीनुसार नगरपालिकेने कारवाई करून त्यांच्यावर दंडात्मक व फौजदारी गुन्हे दाखल करावे व सदर बांधकाम पाडण्यात यावे. विशेष म्हणजे सदर जागा ‘ब’ सत्ताप्रकारात येत असल्याने तसेच औद्योगिक वापरासाठी आरक्षित असल्याने त्यावर अन्य कोणत्याही प्रकारचे बांधकाम करता येत नाही. तरीही बांधकामाचे सर्व नियम पायदळी तुडवून व्यापारी संकुलाचे काम करण्यात येत आहे, असे नगरसेवकांनी निवेदनात नमूद केले आहे. निवेदनावर नगरसेवक तथा भारिप बमसंचे गटनेता फिरोज छट्टू शेकुवाले, सलीम शे.लालू गारवे व निसार खान नजीर खान यांची स्वाक्षरी आहे. निवेदनाच्या प्रतिलिपी जिल्हाधिकारी व नगराध्यक्ष यांनाही देण्यात आल्या आहेत. १८ एप्रिलची वृक्षतोडीची तक्रार प्रलंबित!औद्योगिक क्षेत्रासाठी राखीव असलेल्या जागेवर बांधकामासंबंधी कोणतीही परवानगी न घेता अकोला येथील रमाकांत उमाशंकर खेतान व सैय्यद जाकीर अली सैय्यद इब्राहीम अली हे कृष्णा दाल मिल (भारत गॅस गोडावूनजवळ) कसबे कारंजा नझुल शिट नं.२४ प्लॉट नं.२ येथे अवैधपणे व्यापारी संकूल उभारत आहे. या कामामध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या ४ हिरव्यागार निंबाच्या विशाल वृक्षांची १३ एप्रिल रोजी त्यांनी कत्तल केली आहे. याबाबत संबंधितांनी नगरपालिका प्रशासनाची परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे बायोलॉजिकल डायव्हर्सिटी अ‍ॅक्ट २००२ अंतर्गत कारवाई करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी तक्रार येथील वृक्षसंवर्धन समितीचे सदस्य तथा नगरसेवक फिरोज शेकुवाले, सलीम शेख लालू गारवे व निसार खान नजीर खान यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे १८ एप्रिल रोजी केली आहे. ही तक्रार देखील अद्याप ािली काढण्यात आलेली नाही.व्यापारी संकुलाच्या बांधकामाबाबत संबंधितांनी नगर परिषदेची कुठलीच रितसर परवानगी घेतलेली नाही. त्यामुळे हे काम निश्चितपणे नियमबाह्य ठरते. याप्रकरणी नगरसेवकांची तक्रार प्राप्त झाली असून नियमानुसार पुढील कारवाई केली जाईल.- प्रमोद वानखेडे, मुख्याधिकारी, नगर परिषद, कारंजा लाड