वाशिम : विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी सराफा व्यावसायिकांनी जिल्हाभर दुकान बंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाला व्यावसायिकांचा १00 टक्के प्रतिसाद लाभत असल्याचा दावा संघटनेने केला आहे. वाशिम शहरातील सराफा बाजार कडकडीत बंद आहे. मालेगाव : येथील सराफा असोसिएशन व सुवर्णकार युवा संघटना यांनी सोन्याच्या दागिन्यावर शासनाकडून एक्साईज डयुटी व त्या संदर्भात जाचक अटींच्या निषेधार्थ या अटी कमी करण्यासाठी तहसीलदारांना निवेदन दिले. ३ मार्च रोजी दुपारी १ वाजता तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, केंद्र सरकार व त्यांच्याकडून २९ फेब्रुवारीच्या बजेटच्या तरतुदीनुसार सोन्याच्या सर्व दागिन्यांवर विक्रीकर १ टक्के एक्साईज डयुटी लावण्यात आलेली आहे. एकीकडे सरकार व्यापाराला प्रोत्साहन देऊन लहान-मोठय़ा व्यापार्यांना मदत करण्याची भाषा बोलत आहे, तर दुसरीकडे जाचक अटी लादून सराफा व्यापार बंद पाडण्याचे कारस्थान रचत असल्याचा आरोप व्यावसायिकांनी केला. या अटी रद्द करण्यासाठी २ ते ४ मार्चपर्यंंंत दुकाने बंद ठेवून या कायद्याला विरोध करीत असल्याचे सराफा व्यावसायिकांनी सांगितले. या जाचक अटी रद्द कराव्या, अशी मागणी राजेश वर्मा, रुपेश बानाईतकर, मधुकर खुने, नवल वर्मा, विनोद बानाईतकर, सागर वर्माद्व राहूल गौरकर, राम गौरकर, प्रशांत नवले, तेजेश कल्रूाणकर, ज्ञानेश्वर वाढणकर, राजेश मांडण, सोपान वाढणकर, अजय वर्मा, रमेश नवघरे, प्रवीण पाटील, रामदास इवरकर, आशिष वर्मा, सुरत वर्मा, महेश अंजनक, श्याम गौरकर, अतुल भांडेकर, रोहीत धुमकेकर, नगरसेवक संतोष जोशी यांनी केली. मानोरा येथेही बंद मानोरा : जाचक अटींमुळे सराफा व्यवसायावर संकट येण्याची भीती निर्माण झाली आहे. या अटीचा निषेध म्हणून सराफा व सुवर्णकार व्यावसायिक २ मार्चपासून काम बंद आंदोलनावर आहेत. शासनाने या वाढीचा फेरविचार करून ही जाचक अट त्वरित मागे घ्यावी, अशी मागणी तालुका असोसिएशनच्या वतीने करण्यात आली.
सुवर्णकार संघटनेचे काम बंद आंदोलन
By admin | Updated: March 4, 2016 02:11 IST