रिसोड (वाशिम) : शहरातील सर्मथ नगर येथील एका घरामध्ये व कृषी उत्पन्न बाजार समितीतील दुकानात चोरी करून चोरट्याने ९३ हजारांचा माल लंपास केल्याची घटना २४ ऑक्टोबरच्या रात्री घडली. शहरातील सर्मथनगरमध्ये राहणारे राजकुमार विठ्ठलराव गायकवाड हे घरामध्ये एकटेच झोपले असता चोरट्याने त्यांच्या घराच्या मागील बाजूची लोखंडी ग्रील काढून घरामध्ये प्रवेश केला. घरातील कपाटामधून ५ ग्रॅमची १३ हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी व नगदी रोख असा एकूण ३३,000 रुपयांचा माल चोरून नेला. दुसरीकडे रिसोड कृषी उत्पन्न बाजार समि तीचे आडते किसन धनराज अग्रवाल रा. रिसोड यांच्या दुकानाचा दरवाजाच्या कोंडा तोडून दुकानामध्ये प्रवेश केला. दुकानातील कपाट फोडून नगदी ६0,000 रुपये लंपास केले. या दोन्हीही घटना २४ च्या रात्री १२ ते १ वाजताच्या दरम्यान घडल्यात. याबाबत राजकुमार गायकवाड व किसन धनराज अग्रवाल यांनी रिसोड पोलिसात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून रिसोड पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास रिसोड पोलिस करीत आहेत.
रिसोड येथे एकाच रात्री दोन ठिकाणी चोरी
By admin | Updated: October 26, 2014 00:23 IST