रिसोड (वाशिम) : स्थानिक जुना सराफा लाईन भागातील व गजबजलेल्या वस्तीमध्ये असलेल्या राधिका ज्वेलर्समधून अज्ञात चोरट्यांनी २८ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना १५ नोव्हेंबर रोजी उत्तररात्रीच्या सुमारास घडली. प्राप्त माहितीनुसार जुना सराफा लाईनमध्ये मनिष कमलकिशोर बगडिया यांच्या मालकीचे राधिका ज्वेलर्सचे दुकान आहे. १५ नोव्हेंबरच्या उत्तररात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर तोडून त्यामधील २८ हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. यामध्ये चांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. दुकानात बसविण्यात आलेल्या सीसी कॅमेर्यामध्ये चोरटे कैद झाले असून, पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सराफा दुकानात चोरी
By admin | Updated: November 16, 2014 01:33 IST