शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
2
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
3
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
4
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
5
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
6
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
7
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
8
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
9
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
10
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
11
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
12
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
13
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
14
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
15
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
16
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
17
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी
18
Rahul Gandhi : राहुल गांधींनी मासे पकडण्यासाठी तलावात मारली उडी अन्...; Video तुफान व्हायरल
19
टीनएजर्ससाठी अलर्ट! सुंदर दिसण्याची हौस भलतीच महागात; 'स्किनकेअर'ची क्रेझ धोकादायक
20
IND vs AUS : टिम डेविडची वादळी खेळी! पठ्ठ्यानं मोडला सूर्या दादाचा मोठा विक्रम

क्रिमीलेअरच्या अटीमधून वगळण्याबाबत कुणबी समाजाचे उपविभागीय अधिकाºयांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 13:01 IST

मंगरुळपीर : सकल कुणबी समाज मंगरूळपीर बांधवांचेवतीने २५ आॅक्टोंबर रोजी स्थानिक विश्राम गृहात घेण्यात आलेल्या राज्य मागास वर्ग आयोगाने कुणबी जातीला क्रिमीलेअर उन्नत गटाच्या अटीमधून न वगळल्यामुळे निषेध व्यक्त करीत उपविभागीय अधिकारी, तहसीलदार मंगरूळपीर  यांचे मार्फत शासनाला निवेदन सादर केले.  तसेच अन्यायाविरुद्ध तीव्र लढा उभारण्याच्या हेतूने सहविचार सभेचे आयोजनही यावेळी ...

ठळक मुद्देतहसीलदारांनाही दिले निवेदन सहविचार सभेत व्यक्त केला निषेध

मंगरुळपीर : सकल कुणबी समाज मंगरूळपीर बांधवांचेवतीने २५ आॅक्टोंबर रोजी स्थानिक विश्राम गृहात घेण्यात आलेल्या राज्य मागास वर्ग आयोगाने कुणबी जातीला क्रिमीलेअर उन्नत गटाच्या अटीमधून न वगळल्यामुळे निषेध व्यक्त करीत उपविभागीय अधिकारी, तहसीलदार मंगरूळपीर  यांचे मार्फत शासनाला निवेदन सादर केले.  तसेच अन्यायाविरुद्ध तीव्र लढा उभारण्याच्या हेतूने सहविचार सभेचे आयोजनही यावेळी करण्यात आले होते.

या सभेच्या अध्यक्षस्थानी जि.प. उपाध्यक्ष चंद्रकांतदादा ठाकरे , प्रमुख पाहुणे  शिवसेना जिल्हा प्रमुख राजेश पाटील, वा. क. महल्ले, राज चौधरी,नगर सेवक   अनिल गावंडे , डॉ राहुल सुर्वे यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी समाजाच्या विविध समस्यांवर प्रकाश टाकून समाज अप्रगत आहे व समाजाला प्रगतीच्या मुख्य प्रवाहात नेण्यासाठी क्रिमीलेअर उन्नत गटाच्या अटी मधून वगळले तर समाजाच्या हिताचे ठरेल हे समाज बांधवांना पटवून दिले. कुणबी समाज बांधवांच्यावतीने नोंदविण्यात आलेल्या आक्षेपाच्या निवेदनात महाराष्ट्र राज्य मागास वर्ग आयोगाने २८ आॅक्टोंबर २०१४ रोजी शासनास सादर केलेल्या शिफारसी अहवालात क्र. ४९ नुसार ओ.बी.सी. मधील कुणबी प्रवगाला क्रिमीलेअर मधून वगळण्याबाबत शिफारस केलेली नाही. तसेच या बाबत आक्षेप नोंदविण्यासाठी व्यापक प्रमाणात शासनाच्यावतीने प्रसिद्धी देण्यात आली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील कुणबी समाज बांधवांच्यावतीने या निर्णयावर आक्षेप नोंदविण्यासाठी सदर विभागाचे सहसचिव गावित यांना मंगरूळपीर उपविभागीय अधिकारी, तहसीलदार  यांचे मार्फत निवेदन देण्यात आले. यावेळी कुणबी समाज बांधवा मधून रुपेश धोटे, प्रवीण सावके, गणेश गावंडे, प्रकाश धोटे, धिरज महल्ले, सुरेश गावंडे, मनोज भोयर, जितेंद्र सुर्वे, शेखर देशमुख, राम व्यवहारे, गजानन निचळ, कृष्णा सावके, आशिष खेडकर, संतोष गांजरे, रवी राऊत, घनश्याम व्यवहारे, श्रीकांत भोयर, जगन्नाथ उगले, विशाल ठोकळ, देविदास शिंदे, एन. आर. सुर्वे, राजेंद्र सुर्वे, अविनाश राऊत, परीक्षित उगले, विष्णु सुर्वे, प्रफुल सुर्वे, यांचे सह शेकडो समाज बांधवांच्या निवेदनावर स्वाक्षºया आहेत. कार्यक्रमाचे सूत्र संचालन रुपेश धोटे यांनी तर प्रास्ताविक गोपाल गावंडे यांनी केले.

टॅग्स :social workerसमाजसेवक