शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

२९ ग्रामपंचायतींची होणार राज्यस्तरीय तपासणी!

By admin | Updated: August 10, 2016 01:26 IST

वाशिम जिल्ह्यातील हगणदरीमुक्त गावांबाबत विभागीय चमूचा अहवाल; २९ ग्रामपंचायती तिस-या टप्प्यातील राज्यस्तरीय तपासणीसाठी पात्र ठरल्या आहेत.

दादाराव गायकवाड वाशिम, दि. 0९: जिल्ह्यातील हागणदारीमुक्त ३२ गावांची विभागीय स्तरावरील दुसर्‍या टप्प्यातील तपासणी २७ ते ३0 जुलैदरम्यान करण्यात आली. या तपासणीत जिल्ह्यातील २९ ग्रामपंचायती तिसर्‍या टप्प्यातील राज्यस्तरीय तपासणीसाठी पात्र ठरल्या आहेत. जिल्हा परिषद स्वच्छता मिशन कक्षाकडून ९ ऑगस्ट रोजी ही माहिती प्राप्त झाली.राज्यात २0१४ पासून स्वच्छ भारत मिशन अभियान (ग्रामीण) राबविण्यात येत आहे. याअंतर्गत उघड्यावर शौचास जाणार्‍या कुटुंबांची माहिती घेऊन त्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासह शौचालय ंबांधण्यासाठी प्रेरित केले जात आहे. या अभियानांतर्गत वाशिम जिल्हा परिषदेच्यावतीने ह्यबेसलाईनह्ण तपासणी करून गावांतील शौचालयधारकांची माहिती घेऊन शौचालय नसलेल्या कुटुंबाना शौचालय बांधण्याचे आवाहन केले जात आहे. या अभियानांतर्गत २0१५-१६ या आर्थिक वर्षात निर्धारित उद्दिष्ट पूर्ण केलेल्या ३२ ग्रामंपचायती जिल्हास्तरावरावरील तपासणीत हगणदारीमुक्त घोषित करण्यात आल्या. त्यानंतर हगणदरीमुक्त गावांची माहिती दुसर्‍या टप्प्यातील तपासणीसाठी विभागीय स्तरावर देण्यात आली. अमरावती येथील विभागीय चमूने २७ ते ३१ जुलैदरम्यान संबंधित गावांची तपासणी केली. या चमूने आपला अहवाल वाशिम जिल्हा परिषदेच्या स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाकडे सादर केला. त्यानुसार, ३२ पैकी २९ ग्रामपंचायती तिसर्‍या टप्प्यातील राज्यस्तरीय तपासणीसाठी पात्र ठरल्या. विभागीय पथकाने यासंदर्भातील अहवाल राज्याच्या स्वच्छता आणि पाणीपुरवठा विभागाकडे सादर केला असून, आता राज्यस्तरीय चमूकडूून लवकरच या गावांची तपासणी होणार आहे. याबाबतच्या सूचना पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिल्या आहेत.