स्पर्धेतील विजेत्या तसेच सहभागी युवती, महिलांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. महिलांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, या हेतूने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. वक्तृत्व स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक पाच हजार, द्वितीय पारितोषिक तीन हजार, तृतीय पारितोषिक दोन हजार रोख व प्रमाणपत्र असेल. तसेच उत्तेजनार्थ दोन स्पर्धकांना ११०० रुपये रोख व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी महिलांनी ‘वेगळं जगायचंय मला’, ‘आणखी किती निर्भया’, ‘प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्री असते’, ‘इतिहासातील स्त्री आणि आजची स्त्री’, ‘महिलांना आरक्षण नको, तर संरक्षण हवे’, यासह अन्य विषयांवर वक्तृत्व द्यायचे आहे. स्पर्धकांनी आपला व्हिडीओ २५ मार्चपर्यंत पाठवावा, असे आवाहन भूमिपुत्र संघटनेचे यवतमाळ जिल्हा प्रवक्ता प्रीतम सरग, पवन खोंडकर, रवी पाटील जाधव यांनी केले आहे.
महिलांसाठी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:38 IST