शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अल्लाडा प्लॉट येथे रेशन दुकान सुरु करा : सिध्दार्थ भगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:42 IST

त्यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की, या प्रभागातील स्वस्त धान्याचे दुकान स्थानांतरीत करुन देवपेठ येथे सुरू केल्यामुळे नागरिकांना ...

त्यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की, या प्रभागातील स्वस्त धान्याचे दुकान स्थानांतरीत करुन देवपेठ येथे सुरू केल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अगोदर या प्रभागात स्वस्त धान्याचे दुकान संतोषी माता स्वयंसहाय्यता महिला बचत गटामार्फत चालविण्यात येत होते. सदर बचत गटाविरुध्द तक्रारी प्राप्त झाल्याने बचत गटाला चालविण्याकरिता देण्यात आलेले दुकान रद्द करुन देवपेठ येथे एका बचत गटाकडे ते वर्ग करण्यात आले. यामुळे अल्लाडा प्लॉट व संतोषी माता नगर येथील नागरिकांना त्यांच्या शिधापत्रिकेवरील सर्व माल घेण्याकरिता देवपेठ येथे जावे लागत आहे. अल्लाडा प्लॉट व संतोषी माता नगर ते देवपेठ याचे अंतर २ किलोमीटर आहे. अल्लाडा प्लॉट व संतोषी माता नगरमधील अधिकतर नागरिक हे मोलमजुरी करणारे असल्यामुळे त्यांना सकाळी कामावर निघून जावे लागते. त्यामुळे घरातील महिलांना अल्लाडा प्लॉट व संतोषी माता नगर येथून देवपेठ येथे जाण्यास पुरेसे साधन मिळत नाही तसेच सध्याच्या परिस्थितीमध्ये कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शहरात संचार बंदीची परिस्थिती असल्यामुळे शिधापत्रिकेवरील धान्य आणण्याकरिता नागरिकांना कोणतेही साधन उपलब्ध होऊ शकत नाही. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे बर्‍याचशा अल्लाडा प्लॉट व संतोषी माता नगर मधील नागरिकांची आर्थिक परिस्थिती अतिशय खराब झाली आहे. त्यामुळे तेथील नागरिकांना शिधापत्रिकेवरील मिळणार्‍या मालाची त्यांच्या कुटुंबाचे पालनपोषण करण्याकरिता अल्लाडा प्लॉट व संतोषी मातानगर येथील देवपेठ येथे स्थानांतरीत करण्यात आलेले दुकान अल्लाडा प्लॉट व संतोषी माता नगर येथे सरू करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी निवेदनात केली आहे.