मानोरा (जि. वाशिम) : मानोरा तालुक्यातील वन विभागाच्या मेंद्रा बिटमध्ये ग्रामस्थांनी टाकलेल्या जाळय़ात बिबट्याचे पिलू अडकले. वनविभागाच्या प्रयत्नानंतर बिबट्याला मेंद्राबीट अंतर्गत वनात परत सोडण्यात आल्याची माहिती वनविभागाच्यावतीने ६ मे रोजी देण्यात आली. मानोरा तालुक्यातील आसेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या मेंद्रा बिटमध्ये ५ मे रोजी सकाळी ९ वाजताच्या दरम्यान जाळय़ात बिबट्याचे लहान पिलू अडकल्याची माहिती स्थानिक वनरक्षक व्ही.एस.घुले यांनी वरिष्ठांना दिली. माहिती मिळताच वनविभागातर्फे मानोरा,अकोला व अमरावतीचे वन विभागाचे पथक पिंजरा घेऊन घटनास्थळी दाखल झाले. जाळ्यात अडकलेल्या बिबट्याला जाळ्य़ातून मोकळे केले. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकार्यांने उपचार केले. त्यानंतर सायंकाळी बिबट्याच्या पिलास जंगलात सोडण्यात आले.
शिकारीसाठी लावलेल्या फासात अडकला बिबट
By admin | Updated: May 7, 2017 02:04 IST