शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

एसटी कर्मचार्‍यांचा कनिष्ठ वेतनश्रेणी कालावधी आता वर्षभराचाच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 01:30 IST

वाशिम : महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळातील (एसटी) वर्ग ३  आणि ४ मधील कर्मचार्‍यांचा कनिष्ठ वेतनश्रेणीचा कालावधी  आता तीन वर्षांवरून केवळ एक वर्ष करण्यात आला आहे.  विशेष म्हणजे गत १ एप्रिल २0१७ पर्यंत ज्या कर्मचार्‍यांनी एक  वर्षाचा कालावधी समाधानकाररीत्या पूर्ण केला असेल, अशा  कर्मचार्‍यांनाही या निर्णयाचा लाभ देण्याचे  निर्देश महामंडळाने  दिले असल्याची माहिती एसटीच्या विभागीय अधिकार्‍यांनी  दिली. 

ठळक मुद्देवर्ग ३, ४ श्रेणीतील कर्मचार्‍यांना लाभ १ एप्रिल २0१७ पासूनच लागू करण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळातील (एसटी) वर्ग ३  आणि ४ मधील कर्मचार्‍यांचा कनिष्ठ वेतनश्रेणीचा कालावधी  आता तीन वर्षांवरून केवळ एक वर्ष करण्यात आला आहे.  विशेष म्हणजे गत १ एप्रिल २0१७ पर्यंत ज्या कर्मचार्‍यांनी एक  वर्षाचा कालावधी समाधानकाररीत्या पूर्ण केला असेल, अशा  कर्मचार्‍यांनाही या निर्णयाचा लाभ देण्याचे  निर्देश महामंडळाने  दिले असल्याची माहिती एसटीच्या विभागीय अधिकार्‍यांनी  दिली. एसटी महामंडळातील वर्ग ३ आणि वर्ग ४ मधील कर्मचार्‍यांच्या  कनिष्ठ वेतनश्रेणीचा कालावधी पूर्वी तीन वर्षे होता. हा  कालावधी पूर्ण झाल्यानंतरच संबंधित कर्मचार्‍याला नियमित वे तनश्रेणीवर सामावून घेतले जात होते. आता हा कालावधी तीन  वर्षावरून एक वर्षाचा करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला.  विशेष म्हणजे या निर्णयानंतर कनिष्ठ वेतनश्रेणीत सहा महिने  कालावधी पूर्ण झाल्यानंतरच संबंधित कर्मचार्‍यास वैयक्तिक वे तनश्रेणीही लागू करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला  आहे. महामंडळाच्या निर्णयानुसार ज्या कर्मचार्‍यांचा कनिष्ठ वे तनश्रेणीचा कालावधी १ एप्रिल २0१७ रोजी पूर्ण झालेला  असेल, अशा कर्मचार्‍यांनाही नियमित वेतनश्रेणीत समावून घे तले जाणार आहे. अर्थात एसटी महामंडळाचा निर्णय १ एप्रिल   २0१७ पासूनच लागू होणार आहे. त्यामुळे १ एप्रिल २0१७  किंवा त्यानंतर पुढे कनिष्ठ वेतनश्रेणीचा वर्षभराचा कालावधी  पूर्ण करणार्‍या कर्मचार्‍यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.  

वर्ग ३ आणि वर्ग ४ मधील कर्मचार्‍यांच्या कनिष्ठ वेतनश्रेणीचा  कालावधी १ वर्षाचा करण्यात आल्याची माहिती आहे. या  संदर्भात विभागीय नियंत्रकांकडे अधिक माहिती आहे. अकोला  विभागातील किती कर्मचार्‍यांना या निर्णयाचा फायदा होईल, हे  सध्या निश्‍चित सांगता येणार नाही. - सचिन क्षीरसागर विभागीय वाहतूक नियंत्रक, अकोला परिवहन विभाग