शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

श्रीनृसिंह सरस्वती संस्थानच्या विश्वस्तांची याचिका फेटाळली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 19:22 IST

कारंजा लाड येथील श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराज संस्थानचे अध्यक्ष, व्यवस्थापक, विश्वस्त, अंकेक्षक व सनदी लेखापाल आदिंविरूद्ध दाखल गुन्हे रद्द करावे, या मागणीसाठी टाकलेली याचिका नागपूर खंडपिठाने २१ नोव्हेंबर रोजी फेटाळल्याची माहिती न्यायमुर्ती एम.जे.गिराटकर, आर.के.देशमुख यांनी दिली.

ठळक मुद्दे कारंजा येथील प्रकरणनागपूर खंडपिठाचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड (वाशिम): येथील श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराज संस्थानचे अध्यक्ष, व्यवस्थापक, विश्वस्त, अंकेक्षक व सनदी लेखापाल आदिंविरूद्ध दाखल गुन्हे रद्द करावे, या मागणीसाठी टाकलेली याचिका नागपूर खंडपिठाने २१ नोव्हेंबर रोजी फेटाळल्याची माहिती न्यायमुर्ती एम.जे.गिराटकर, आर.के.देशमुख यांनी दिली.कारंजा येथील श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराज संस्थानमध्ये ३६ कोटी ३७ लक्ष ७९ हजार ८३३ रूपयांची अफरातफर झाल्याची तक्रार कारंजा लाड येथील शेखर पुरूषोत्तम काण्णव यांनी कारंजा शहर पोलिस स्टेशनला ३१ मे २०१५ रोजी दाखल केली होती. त्यावरून पोलीसांनी संस्थानचे अध्यक्ष नारायण खेडकर, व्यवस्थापक वसंत सस्तकर, उमाकांत पांडे, श्रीपाद पळसोकर, प्रकाश घुडे, अंकेक्षक सुभाष मुंगी, संस्थेचे सनदी लेखापाल संजय खांडेकर आदिंविरूध्द कलम ४२०, ४६५, ४६८, ४०८, ४७१ व ३४ भादंविनुसार गुन्हे दाखल केले. त्याविरूध्द गुरूमंदीर संस्थान अध्यक्ष, व्यवस्थापक व विश्वस्तांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात ‘क्रिमीनल अ‍ॅप्लीकेशन अ‍ेपीएल नं. ३६९ आॅफ २०१५’ अन्वये १५ जून २०१५ रोजी पोलीस स्टेशन अधिकारी, कारंजा, शेखर पुरूषोत्तम काण्णव, अनंत गजानन आठल्ले, प्रमोद दहिहांडेकर, गजानन जोशी यांच्याविरूद्ध याचिका सादर करून पोलीसांनी दाखल कलेले सर्व गुन्हे रद्द करावे, अशी मागणी केली होती. याचिकाकर्त्यांच्या वतीने अभियोक्ता फिरदोस मिर्झा, ए.एस.देशपांडे; तर सरकारी पक्षाच्यावतीने सहा. सरकारी अभियोक्ता व्हि.पी.गणगणे आणि विरूध्द पक्षाच्यावतीने अभियोक्ता श्रीरंग भांडारकर यांनी कामकाज पाहिले. दरम्यान, न्यायमुर्ती एम.जे.गिराटकर व न्यायमुर्ती आर.के.देशपांडे यांनी दोन्ही पक्षांसह सरकार पक्षाच्यावतीने करण्यात आलेला युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर १४ नोव्हेंबर २०१७ रोजी याचिकेचा निकाल राखून ठेवला होता. त्याचा निर्णय २१ नोव्हेंबर रोजी देण्यात आला. त्यानुसार, श्रीगुरूमंदीर संस्थानच्यावतीने दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे आता यापुढे श्रीनृसिंह सरस्वती संस्थानचे विश्वस्त मंडळाने संगनमत करून देवस्थानला मिळालेल्या देणगीच्या रक्कमेत अफरातफर केल्याच्या तक्रारीचा तपास स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम करण्यास मोकळे झाले आहेत.

टॅग्स :Courtन्यायालय