शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस अधिकार्‍यांना विशेष अधिकार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 01:15 IST

वाशिम : ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळात कायदा-सुव्यवस् था कायम राखण्याचा प्रयत्न म्हणून जिल्ह्यातील सर्व फौजदार  व त्यापेक्षा वरिष्ठ अधिकार्‍यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम  १९५१ चे कलम ३६ नुसार ३  ते १२ ऑक्टोबर २0१७ या  कालावधीत विशेष अधिकार प्रदान करण्यात येत असल्याची  माहिती पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी बुधवारी दिली.

ठळक मुद्देग्रामपंचायत निवडणूक कायदा, सुव्यवस्था कायम राखण्याचा प्रयत्न 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळात कायदा-सुव्यवस् था कायम राखण्याचा प्रयत्न म्हणून जिल्ह्यातील सर्व फौजदार  व त्यापेक्षा वरिष्ठ अधिकार्‍यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम  १९५१ चे कलम ३६ नुसार ३  ते १२ ऑक्टोबर २0१७ या  कालावधीत विशेष अधिकार प्रदान करण्यात येत असल्याची  माहिती पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी बुधवारी दिली.नोव्हेंबर व डिसेंबर २0१७ मध्ये मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतींच्या  सार्वत्रिक निवडणुकीमुळे जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली  आहे. वाशिम जिल्ह्यातील एकूण २७३ ग्रामपंचायतींच्या  निवडणुकीकरिता ७ ऑक्टोबर २0१७ रोजी मतदान होणार  असून, ९ ऑक्टोबर २0१७ रोजी मतमोजणी होणार आहे. या  काळात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी जिल्ह्यातील  सर्व फौजदार व त्यापेक्षा वरिष्ठ अधिकार्‍यांना यादरम्यान विशेष  अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. त्यानुसार मिरवणूक अ थवा जमावातील लोकांना कशा रीतीने चालावे, याचे निर्देश  देणे, मिरवणुकीचा मार्ग व वेळ विहित करणे, मिरवणूक व  जमावाच्या प्रसंगी व उपासनेच्या जागांच्या आसपास उपासनेच्या  वेळी व कोणत्याही रस्त्यावरून किंवा सार्वजनिक जागा अथवा  सार्वजनिक स्थळी गर्दी होणार असेल, अशा सर्व प्रसंगी अड थळा होऊ न देणे, सार्वजनिक स्थळी सुव्यवस्था राखणे,  सार्वजनिक ठिकाणी अथवा रस्त्यांवर किंवा सार्वजनिक  जागेवर, जागेजवळ गाणी, वाद्य वाजविणे किंवा गाणे गाण्याचे,  ढोल-ताशे व इतर वाद्य वाजविण्याचे आणि इतर कर्कश वाद्य  वाजविण्याचे विनियमन करणे व त्यावर नियंत्रण ठेवणे, कोण त्याही सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ किंवा कोणत्याही  सार्वजनिक करमणुकीच्या ठिकाणी ध्वनिक्षेपकांचा उपयोग  करण्याचे विनियमन करणे व त्यावर नियंत्रण ठेवणे तसेच सक्षम  प्राधिकारी यांनी कलम ३३, ३५, ३७ ते ४0, ४२, ४३, व ४५ या  अन्वये दिलेल्या कोणत्याही आदेशास अधीन असलेले व त्यास  पुष्टी देणारे योग्य आदेश देण्याचे अधिकार जिल्ह्यातील सर्व  फौजदार व त्यापेक्षा वरिष्ठ अधिकार्‍यांना ३ ऑक्टोबर ते १२  ऑक्टोबर या कालावधीत प्रदान करण्यात आले आहेत. तसेच  या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती महाराष्ट्र पोलीस  अधिनियम कलम १३४ प्रमाणे शिक्षेस पात्र राहील, असे जिल्हा  पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी सांगितले.