०००००
केनवड येथे आणखी चार रुग्ण
वाशिम : रिसोड तालुक्यातील केनवड येथे आणखी चाैघांचा कोरोना चाचणी अहवाल १७ मे रोजी पॉझिटिव्ह आला आहे. संदिग्ध रुग्णांचे स्वॅब घेण्यात येणार असून, नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले.
०००
नाभिक समाजबांधव सापडले अडचणीत
वाशिम : जिल्ह्यात २० मेपर्यंत कडक निर्बंध लागू केले आहेत. जीवनावश्यक वस्तूंची दुकानेवगळता इतर आस्थापना बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्याचा फटका सलून व्यावसायिकांना बसला असून, शासनाने दरमहा किमान १० हजार रुपयांचे पॅकेज द्यावे, अशी मागणी पवन कणखर यांनी सोमवारी केली.
०००००
नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाने बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. ही बाब लक्षात घेता नागरिकांनी काळजी घेऊन नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांनी सोमवारी केले आहे.
००००००
रस्त्यावर पुन्हा फेरीवाले
वाशिम : कडक निर्बंधामधून सूट मिळताच फेरीवाले हे वाशिम शहरातील प्रमुख रस्त्यांवर उभे राहून मालाची विक्री करत असल्याचे सोमवारी दिसून आले. त्यामुळे सकाळी १० वाजताच्या सुमारास पाटणी चौकात वाहतूक प्रभावित होते.
०००००००
रोहयोची कामे सुरू करा
वाशिम : शेतीचा हंगाम संपल्यामुळे रोजगारासाठी रोजगार हमी योजनेंंतर्गत कामे उपलब्ध होणे आवश्यक आहे. रिठद, केनवड, शिरपूर, किन्हीराजा परिसरात रोहयोची कामे ठप्प असल्याने शेतमजुरांची चिंता वाढली आहे. रोजगार हमी योजनेंतर्गत कामे सुरू करावी, अशी मागणी होत आहे.
००००००००००
मांगूळझनक येथे आणखी एक रुग्ण
वाशिम : रिसोड तालुक्यातील रिठद येथे सोमवारी आणखी एक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला. आरोग्य विभागाने सर्वेक्षण केले असून, नागरिकांनी घाबरून जाऊ नये, दक्षता घ्यावी, असे आवाहन केले.
००००