रिसोड (वाशिम) : स्थानिक पंचायत समितीचे विद्यमान सभापती व उपसभापतीविरूद्ध सत्ताधारी भाजपासह सेनेच्या सदस्यांनी दाखल केलेला अविश्वास ठराव मंगळवारी बहुमताने पारित झाला.अडीच वर्षांचा कार्यकाळ संपल्याने जून २०१६ मध्ये रिसोड पंचायत समिती सभापती व उपसभापती पदासाठी निवडणुक घेण्यात आली होती. त्यावेळी भाजपाने सभापती व उपसभापती अशी दोन्ही पदे काबीज केली होती. दरम्यान दहा महिन्याच्या कालावधीत बरीच उलथापालथ झाल्याने भाजपासह शिवसेनेच्या १२ सदस्यांनी सभापती प्रशांत खराटे व उपसभापती विनोद नरवाडे यांच्याविरूद्ध ११ एप्रिल रोजी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. यासंदर्भात १८ एप्रिल रोजी पंचायत समितीच्या सभागृहात विशेष सभा घेण्यात आली. १८ सदस्य संख्या असलेल्या पंचायत समिती सभागृहात १२ सदस्य उपस्थित होते. बाराही सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केल्याने अविश्वास ठराव पारित झाल्याचे पिठासीन अधिकाऱ्यांनी घोषित केले.
सभापती-उपसभापतींवरील अविश्वास ठराव पारित
By admin | Updated: April 18, 2017 19:40 IST