शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यांत सोयाबीनच्या दरात ५०० रुपये तफावत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 12:03 IST

Washim APMC News वाशिम येथील बाजार समितीत ४,७३० रुपये प्रति क्विंटल, तर कारंजा बाजार समितीत अवघे ४,२५० रुपये दर मिळाले.

 लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यातील बाजार समित्यांत सद्य:स्थितीत सोयाबीनची विक्रमी आवक होत आहे. या शेतमालाचा उठाव असल्याने व्यापारी हमीदरापेक्षा अधिक दरात सोयाबीन खरेदी करीत आहेत. तथापि, प्रत्येक बाजार समितीमधील दरात फरक असून, काही ठिकाणी तब्बल ५०० रुपये तफावत असल्याने शेतकरी संभ्रमात पडले आहेत.जिल्ह्यात सद्य:स्थितीत कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि खासगी बाजारांत मिळून दिवसाला एक लाख क्विंटलच्या घरात सोयाबीनची आवक होत आहे. या शेतमालाचा उठाव चांगला असल्याने व्यापाऱ्यांत खरेदीसाठी चढाओढ सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हमीदरापेक्षा अधिक दर मिळत आहेत. शासनाने सोयाबीनला ३८८० रुपये हमीदर घोषित केले असताना बाजार समित्यांत त्यापेक्षा सरासरी ४०० रुपये अधिक दराने सोयाबीनची खरेदी होत आहे. तथापि, काही बाजार समित्यांचे दर मोठ्या प्रमाणात असताना काही बाजार समित्यांत मात्र अपेक्षेने कमी दर शेतकऱ्यांना मिळत आहेत. वाशिम येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी सोयाबीनला कमाल ४,७३० रुपये प्रति क्विंटल दर मिळाले, तर कारंजा बाजार समितीत अवघे ४,२५० रुपये, मंगरूळपीर बाजार समितीत ४,३९० रुपये,  रिसोड बाजार समितीत ४,३५० रुपये, तर मानोरा बाजार समितीत ४,५०० रुपये प्रति क्विंटलचे दर मिळाले. दरातील या तफावतीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याने त्यांच्यात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.ऊनच्या भितीपोटी शेतकऱ्याची घाई जिल्ह्यासह राज्यात कोरोना संसर्ग वाढत आहे. कोरोना संसर्गाची ही दुसरी लाट असल्याचे सांगितले जात असून, शासन पुन्हा लॉकडाऊन लावण्याच्या विचारात असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे बाजार समित्याही बंद होण्याची भिती असल्याने शेतकरी सोयाबीनच्या विक्रीवर भर देत आहेत. अगदी रात्रीपासून बाजार समितीसमोरील मार्गावर किलोमीटर अंतरापर्यंत सोयाबीनच्या वाहनांची रांग लागल्याचे चित्र विविध ठिकाणी पाहायला मिळत आहे.

बाजार समित्यांत शेतमालाचे दर व्यापारी मनमानी पद्धतीने ठरवितात. वाशिम येथे जर सोयाबीनला  ४७३० रुपये प्रति क्विंटल दर मिळत असतील, तर इतर बाजार समित्यांत कमी दर क से, असा प्रश्न उपस्थित होतो. प्रशासकीय यंत्रणेकडून याची शहनिशा होणे आवश्यक आहे.-गोपाल आरेकर,शेतकरी, इंझोरी

टॅग्स :washimवाशिमAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीagricultureशेती