शहरं
Join us  
Trending Stories
1
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
2
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
3
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
4
तोंडात कुरकुरे अन् निपचित पडलेला मृतदेह; कोर्टातून फरार झालेल्या आरोपीचा चिमुकलीवर अत्याचार
5
मुंबई-पुण्यात घरांच्या विक्रीत १७% घट; 'या' कारणांमुळे ग्राहकांनी फिरवली पाठ; किमती कमी होणार का?
6
‘आयुष्मान भारत’ योजना बंद पडली? नागपूरच्या रुग्णालयांमध्ये उघडकीस आले धक्कादायक वास्तव; रुग्णांना सेवा नाकारल्या
7
Video - "देवाने हे नियम बनवले नाहीत..."; शॉर्ट्स घालून महिलेने मंदिरात प्रवेश केल्याने मोठा गोंधळ
8
VIDEO: 'पॉवर हिटिंग'! ३ वर्षांच्या चिमुरड्याची बॅटिंग पाहून तुम्हीही म्हणाल- What a Shot!
9
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
10
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
11
कोजागरी शरद पौर्णिमा २०२५: पंचकाची अशुभ छाया अन् अमंगल काळ, शुभ मुहूर्त कधी? लक्ष्मी लाभेल!
12
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
13
Dombivli Crime: मोबाईलचा पासवर्ड बदलला, कुटुंबात राडा! आई, दोन्ही मुले, आजोबामध्ये तुंबळ हाणामारी
14
अमानुष! लेकीशी भांडण... सासरच्यांनी जावयाला विष पाजलं, पळवून पळवून मारलं; झाला मृत्यू
15
२०२७ पर्यंत ५ राशींना साडेसाती, प्रदोषात ‘हे’ करावे; पंचक कायमचे टळेल, शनि शुभ-कल्याण करेल!
16
आंध्र प्रदेशात देवरगट्टू बन्नी उत्सवादरम्यान दोन जणांचा मृत्यू, ९० जण जखमी
17
Video: छातीत झाडल्या तीन गोळ्या, मित्राच्या हत्येचा बनवला व्हिडीओ; पोलिसांची उडाली झोप
18
हव्वा अन् धुव्वा...! महिंद्रा थार फेसलिफ्ट लाँच! हे दोन मुख्य बदल, ग्राहकांची मागणी ऐकली..., दोन नवे रंग...
19
Crime: 'मी तुमच्या मुलीची हत्या केलीये'; मित्रासोबत रुमवर गेली अन् निळ्यामध्ये ड्रममध्ये...; तरुणीची हत्या का केली?
20
Neena Kulkarni: ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना मानाचे विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर!

परतीच्या पावसाने सोयाबीनचे नुकसान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 01:36 IST

गत आठवड्यात झालेल्या परतीच्या पावसाने सोयाबीनला मोठी हाणी पोहोचवली आहे. बहुतांश शेतकर्‍यांचे सोयाबीन भिजल्याने प्रतवारीत दज्रेदारपणा राहिला नाही. परिणामी, भिजलेल्या सोयाबीनला कवडीमोल भावात विकण्याशिवाय शेतकर्‍यांसमोर पर्याय राहिला नाही. 

ठळक मुद्दे बाजारभावात घसरण  शेतकर्‍यांचे बजेट कोलमडतेय

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गत आठवड्यात झालेल्या परतीच्या पावसाने सोयाबीनला मोठी हाणी पोहोचवली आहे. बहुतांश शेतकर्‍यांचे सोयाबीन भिजल्याने प्रतवारीत दज्रेदारपणा राहिला नाही. परिणामी, भिजलेल्या सोयाबीनला कवडीमोल भावात विकण्याशिवाय शेतकर्‍यांसमोर पर्याय राहिला नाही. सन २0१६ चा अपवाद वगळता मागील तीन-चार वर्षांपासून निसर्गाची साथ मिळाली नसल्याने शेतकर्‍यांवर नानाविध संकटे ओढवली होती. गतवर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने अपेक्षित उत्पादन झाले; मात्र शेतमालाला बाजारभाव नसल्याने शेतकर्‍यांच्या पदरी निराशा पडली होती. गतवर्षीचे चांगले-वाईट अनुभव पचवित यावर्षीदेखील खरीप हंगामात शेतकर्‍यांनी मोठय़ा आनंदात पेरणी केली. यावर्षी चार लाख नऊ हजार हेक्टरपैकी सव्वा दोन लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली होती. पेरणीनंतर पावसात सातत्य नसल्याने तसेच ऐन शेंगा धरण्याच्या कालावधीत पाऊस गायब झाल्याने सोयाबीनच्या उत्पादनात प्रचंड घट आली. अशातच परतीच्या पावसाने सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांची दाणादाण उडविली. गत आठवड्यात चार ते पाच दिवस परतीचा दमदार पाऊस झाला. त्यामुळे शेतात सोंगून करून ठेवलेले सोयाबीन मोठय़ा प्रमाणात भिजले. तीन ते चार दिवसात फारसा खंड न दिल्याने शेतकर्‍यांना सोंगून ठेवलेले सोयाबीन वाळवितादेखील आले नाही. त्यामुळे आता भिजलेल्या सोयाबीनची प्रतवारी फारच खालावल्याचे दिसून येत आहे. सव्वा दोन लाख हेक्टरपैकी जवळपास ७0 ते ८0 हजार हेक्टरवरील सोयाबीनला परतीच्या पावसाने जबर हाणी पोहोचविल्याची भीती कृषी विभागानेदेखील वर्तविली आहे. गत तीन दिवसांपासून परतीचा पाऊस नसल्याने मोठय़ा प्रमाणात सोयाबीनची काढणी सुरू झाली आहे. तथापि, भिजलेल्या सोयाबीनची प्रतवारी घसरल्याने १२00 ते १५00 च्या दरम्यान या सोयाबीनला भाव मिळत असल्याचा दावा शेतकर्‍यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. बाजार समित्यांमध्ये भिजलेले सोयाबीन कवडीमोल भावाने घेतले जात असल्याने शेतकर्‍यांचे बजेट पुरते कोलमडून जात आहे. ऐन दिवाळीदरम्यान अशी परिस्थिती ओढवल्याने अल्प भूधारक शेतकर्‍यांवर आर्थिक संकट ओढवले. अगोदरच उत्पादनात प्रचंड प्रमाणात घट; त्यातही परतीच्या पावसाने लावलेला ‘डाग’, यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी पुरता हवालदिल झाल्याचे दिसून येते. परतीच्या पावसामुळे सोयाबीन भिजल्याने एक हजार ते १५00 रुपयादरम्यान या सोयाबीनला भाव मिळत असल्याचे किनखेडा येथील शेतकरी गजानन अवचार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. 

 

टॅग्स :agricultureशेती