शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पुरेसा पाऊस, बीज प्रक्रियेनंतरच पेरणी करावी -एस. एम. तोटावार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 11:32 IST

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस. एम. तोटावार यांच्याशी शनिवारी साधलेला हा संवाद...

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सध्या खरीप हंगामाला सुरुवात झालेली आहे. शेतकरी पेरणीच्या कामाला लागले आहेत. या हंगामाबाबत कृषी विभागाचे नियोजन आणि शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाºया उपाययोजनांबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस. एम. तोटावार यांच्याशी शनिवारी साधलेला हा संवाद...

यंदाच्या हंगामात पेरणीचे नियोजन किती क्षेत्रावर आहे. ?जिल्ह्यातील खरीप पिकांचे सरासरी क्षेत्र ४ लाख ७०९ हेक्टर आहे, तर गतवर्षी जिल्ह्यात ४ लाख २ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. यंदा त्यात वाढ करून ४ लाख १५ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचे नियोजन केले आहे.

खरीप पेरणीबाबत शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी ?सद्यस्थितीत जिल्ह्यात पडत असलेला पाऊस हा अवकाळी पाऊस आहे. जिल्ह्यात मृग नक्षत्राच्या पावसाची अद्याप सुरूवात झाली नाही. प्रथम मान्सून हा गोवामार्गे मुंबई व महाराष्ट्रात पोहचतो शुक्रवारच्या हवामान अंदाजानुसार येत्या २-३ दिवसात मान्सून सक्रीय होण्याची शक्यता आहे. समाधानकारक पाऊस पडल्यानंतर अथवा ७५ ते १०० मि.मी. पाऊस पडल्यानंतर शेतकºयांनी पेरणीस सुरवात करावी.

यांत्रिक पेरणीबाबत काय सांगाल?गेल्या तीन दिवसांपासून काही भागांत खरीप पेरणी शेतकरी करीत आहेत. यात पेरणी यंत्राच्याबियाण्याच्या बॉक्सपासून निघालेल्या नळया रासायनीक खताच्या खाच्यात व रासायनिक खताच्या बॉक्सपासून निघालेल्या नळया बियाण्याच्या खाच्यात जोडल्या जाताहेत. त्यामुळे पेरणीच्यावेळी बियाणे खाली व खत वर पेरले जात असल्याचे दिसत आहे. अशा प्रकारची पेरणी चुकीची असून, सोयाबीनचे बियाणे ५ सेमी पेक्षा जास्त खोलीवर पडते व खत ३ ते ५ सेमी खोलीवर पडते. वास्तविक पाहता पेरणी करीत असताना बियाणे ३ ते ५ सेमी खोलीवर व खते ५ सेमीपेक्षा जास्त खोलीवर पडणे आवश्यक असते. शेतकºयांनी पेरणी करण्यापूवी बियाणे व खताच्या नळया योग्य खाच्यात लावल्याची खात्री करुनच पेरणी करावी.

कृषी विद्यापिठाचा सल्ला महत्त्वाचा?कृषि विद्यापिठाच्या संदेशानुसार जमिनीत ७५ ते १०० मिमी पाऊस पडून जमिनीतील ओलावा संतृप्त झाल्याशिवाय पेरणी करू नये, असा संदेश असला तरी काही शेतकºयांनी कापूस व इतर पिकाच्या पेरणीस सुरूवात केली आहे. बियाणे उगवणीसाठी जमिनीत पुरेसा ओलावा आवश्यक आहे, त्यासाठी सरासरी ७५ मिमी पाऊस पडणे आवश्यक आहे. ७५ मिमी पेक्षा कमी पावसावर पेरणी केल्यास जमिनीत ओलावा नसल्यामुळे जमिनीतील उष्णतेमुळे पेरलेल्या बियाण्याचे कमी प्रमाणात अंकुरण होते.

 

टॅग्स :washimवाशिमAgriculture Sectorशेती क्षेत्रinterviewमुलाखत